उत्तरेकडे हवामानात मोठे बदल
हवामान विभागाच्या मते, सध्या एक ट्रफ लाईन सक्रिय आहे आणि 21 जानेवारीच्या रात्रीपासून एक नवीन प्रभावी वेस्टर्न डिस्टर्बन्स उत्तर भारताला धडक देणार आहे. यामुळेच पुढील सात दिवस संपूर्ण उत्तर आणि मध्य भारताच्या हवामानात मोठे फेरबदल होणार आहेत. पश्चिम बंगालच्या उपसागरात सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे. तर दिल्लीवरही सायक्लोनिक सर्क्युलेशनचा धोका आहे. उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि दाढ धुकं यामुळे उत्तर भारतात परिस्थिती बिकट आहे. महाराष्ट्रात मात्र रात्री आणि पहाटे थंडगार गारवा वाटत असून दिवसा मात्र तापमान वाढ होत आहे.
advertisement
महाराष्ट्रावर काय परिणाम होईल?
उत्तर भारतात सक्रिय होत असलेल्या 'वेस्टर्न डिस्टर्बन्स'मुळे उत्तरेकडून येणारे थंड वारे रोखले जातील. परिणामी, मध्य भारत आणि महाराष्ट्रात येत्या 2-3 दिवसांत तापमानाचा पारा वर चढणार आहे. राज्याच्या बहुतांश भागात हवामान कोरडे राहील, पण बोचरी थंडी कमी झालेली जाणवेल. महाराष्ट्रात थंडी कमी होत असताना उत्तर भारतात मात्र हवामानाचा डबल अटॅक पाहायला मिळणार आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात कमाल तापमान 33 ते 35 डिग्री अंशांपर्यंत पोहोचलं आहे.
पावसाचा इशारा, महाराष्ट्रात काय स्थिती?
22 आणि 23 जानेवारीला जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. २३ जानेवारीला हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही पावसासह हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. 22 ते 26 जानेवारी दरम्यान पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. पुढचे दोन-तीन दिवस पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये दाट धुके कायम राहील, ज्यामुळे वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो.
