शंभर टक्के गॅस पुरवठा करण्याचे आदेश
प्रमुख्याने रुग्णालये, शासकीय आश्रम शाळा, अनुदानित आश्रम, शाळा वसतिगृह, शासकीय खानावळ, मध्यान्ह भोजन, अंगणवाडी अशा सर्व संस्थांना शंभर टक्के गॅस पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या सर्व संदर्भात दररोजचा अहवाल सादर करण्याचे गॅस सिलेंडर एजेन्सीलाला आदेश देखील देण्यात आलेत. त्यामुळे सिलेंडर एजेन्सीला आता कोणत्याही गोष्टीत कुचकामीपणा करता येणार नाही. सार्वजनिक सेवेतील संस्थांना 100 टक्के गॅस पुरवठा केला जाणार आहे.
advertisement
उपाहारगृहांना 70 टक्के पुरवठा
राज्यातील उपाहारगृहांना 70 टक्के पुरवठा करण्यात यावेत असा आदेश देण्यात आलाय. तर औषध उद्योग 50 टक्के, बीज प्रक्रिया 50 टक्के, मस्य पालन व्यवसायांना 50 टक्के सिलेंडर पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रेल्वे, संरक्षण क्षेत्र, पोलीस तुरूंग, हवाई वाहतुकांना 70 टक्के गॅस पुरवठा केला जाईल.
सिलेंडर खरेदीसाठी नागरिकांच्या रांगा
दरम्यान, घरगुती सिलेंडरचा पुरवठा सुरळीत होत नसल्याने आता नागरिकांनी चुलीवर स्वयंपाक करण्याचा मार्ग निवडला असून नागरिक घरची चूल पेटविण्यासाठी आता लाकडाची खरेदी मोठ्या प्रमाणात करत आहे, नागपूर मधल्या अनेक गॅस एजन्सी बाहेर सिलेंडर खरेदीसाठी नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत यात अनेक लोक मजदूर काम करणारे असल्याने दिवसभर रांगेत लागण शक्य होत नसल्याने अखेर घरी तात्पुरता स्वरूपातली चूल तयार करून लाकडांवर घरचा स्वयंपाक केला जात आहे यासाठी नागपूरच्या लकडगंज परिसरात लाकडं खरेदीसाठी नागरिक येत आहे. तर पुणे आणि मुंबईत देखील मोठमोठ्या रांगा लागल्याचं पहायला मिळतंय.
