सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणूकच्या अनुषंगाने महाविकास आघाडीचे जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि मनसे हे चार पक्ष मिळून 102 जागा लढणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीत सामील झाली असून शिवसेना ठाकरे पक्षाच्या कोट्यातून मनसेला मिळणार जागा मिळणार आहे. काँग्रेस 45, शिवसेना ठाकरे गटाचे 30, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 20, माकप 7 असे जागा वाटप करण्यात आले आहे.
advertisement
महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा 4 जानेवारीला नारळ फोडणार
महाविकास आघाडी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा 4 जानेवारीला नारळ फोडणार आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, खा. प्रणिती शिंदे, माजी आमदार आडम मास्तर, खा ओमराजे निंबाळकर, चंद्रकांत खैरे, खा. धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. महायुतीविरोधात महाविकास आघाडी करणार जोरदार प्रचार आहे.
काँग्रेस पक्षाकडून पहिली वीस जणांची यादी जाहीर
तर सोलापूरमध्ये काँग्रेस पक्षाकडून पहिली वीस जणांची यादी करण्यात जाहीर करण्यात आली आहे . नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाल्यानंतर आता महानगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेस जय्यत तयारीनिशी उतरत आहे. आज सोलापूर महानगरपालिकेसाठी 20 उमेदवारांची पहिली यादी पक्षाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने जाहीर करण्यात आली आहे.
निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांचा उत्साह दांडगा
महानगरपालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांचा उत्साह दांडगा असून उमेदवारीसाठी मोठ्या संख्येने इच्छुकांनी मागणी केली आहे. दोन दिवसापूर्वी मुंबईत राज्य निवड मंडळाच्या बैठकीत उमेदवार निश्चित करण्यात आले होते त्यानुसार सोलापूरसाठी ही पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयाने दिली आहे. बदलत्या सत्तासमीकरणांमुळे यंदाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
