आसिफ मुझे व्हिडिओ की...
इशरतने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत, "अम्मी, अब्बा मुझे माफ करना, आसिफ मुझे व्हिडिओ की धमकी दे रहा है" अशी चिठ्ठी लिहून आपल्या आई-वडिलांची माफी मागितली. अवघ्या दीड महिन्यापूर्वीच तिचा विवाह झाला होता. अहमदपुरा भागात राहणाऱ्या इशरतचा विवाह अवामी नगर भागातील तरुणाशी झाला होता. इशरतच्या मृत्यूमुळे तिच्या पतीला मानसिक धक्का बसला असून, त्याच्यावर एका खासगी रुणालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
राहत्या घरी आत्महत्येचं पाऊल उचललं
माहेरच्या परिसरात राहणारा आसिफ मुसा शेख खान हा तिला मोबाईलवर तसेच प्रत्यक्ष भेटून धमकी देत ब्लॅकमेल करत होता, असं तपासात समोर आलं आहे. सोमवारी दुपारी ती माहेरी आली असताना तिने राहत्या घरी हे आत्महत्येचे पाऊल उचलले. शेजाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. रमजानपुरा पोलिसांनी तिला सामान्य रुग्णालयात दाखल केले, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पतीने दिलेल्या फिर्यादीवरून आसिफविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आसिफ मुसा शेख खान याला अटक
दरम्यान, संशयित आसिफ मुसा शेख खान याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला 12 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेला प्रेम प्रकरणाची किनार आहे का, याचाही तपास सुरू आहे. संशयित आसिफ हा मानसिक त्रास देत होता, असे फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक एएम माळी यांनी सांगितले की, पुढील चौकशी सुरू आहे.
