TRENDING:

Manoj Jarange Patil On Chhagan Bhujbal : ''तो प्युअर येडपट, काहीही बरळतो'', मनोज जरांगेंचा भुजबळांवर पलटवार

Last Updated:

Manoj Jarange Patil On Chhagan Bhujbal : भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा उल्लेख केला. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांवर जोरदार पलटवार केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
रवी जयस्वाल, प्रतिनिधी, जालना :  उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धक्कातंत्राचा वापर करत छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून वगळले. मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने छगन भुजबळ हे नाराज झाले आहेत. भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा उल्लेख केला. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांवर जोरदार पलटवार केला आहे.
तो प्युअर येडपट, काहीही बरळतो, जरांगेंचा भुजबळांवर पलटवार
तो प्युअर येडपट, काहीही बरळतो, जरांगेंचा भुजबळांवर पलटवार
advertisement

अजित पवारांनी आपल्या राष्ट्रवादीच्या कोट्यातील मंत्र्यांच्या नावाबाबत धक्कातंत्राचा वापर केल्याचे दिसून आले. भुजबळ यांचा समावेश निश्चित मानला जात होता. भुजबळांना मंत्रिपदी संधी न मिळाल्याने भुजबळ समर्थक नाराज होते. आता छगन भुजबळांदेखील आपली प्रतिक्रिया व्यक्त करत मी नाराज असल्याचे नागपूरमध्ये म्हटले.

भुजबळांनी जरांगेबाबत काय म्हटले?

छगन भुजबळ यांना विधीमंडळ सभागृह आवारात पत्रकारांनी मंत्रिपद न मिळाल्याबाबत विचारले असता त्यांनी म्हटले की, नव्यांना संधी देण्यासाठी मला डावलण्यात आले. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आरक्षणाच्या मुद्यावर अंगावर घेतल्याचे बक्षीस मला मिळाले असल्याची ख खंत छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. मी सामान्य कार्यकर्ता आहे..त्यामुळे मला डावललं काय, फेकलं काय, काय फरक पडतो असंही भुजबळ यांनी म्हटले. मंत्रिपद किती आले आणि गेले पण छगन भुजबळ काही संपणार नाही असेही त्यांनी म्हटले.

advertisement

मनोज जरांगेंचा पलटवार...

मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांवर पलटवार केला आहे. जरांगे यांनी म्हटले की, भुजबळ नाराज आहेत की नाही, याचे मला काहीही देणंघेणं नाही. तो प्रश्न त्यांच्या सरकारचा आहे. मला राजकीय विषयात पडायचं नाही. माझ्यासाठी मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. तू डोनाल्ड ट्रमची जागा घे, मला काय करायचं असं म्हणत मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तो कुणीकडेही बरळत असतो. तो प्युवर एडपट आहे. तू डोनाल्ड ट्रम्पची जागा घे. मला काही करायचं नाही असं जरांगे यांनी म्हंटले. मी माझ्या मराठा समाजाचा सामान्य कार्यकर्ता असून मला मराठा आरक्षणाचा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. आरक्षणासाठीचा संघर्ष पुन्हा सुरू करणार असल्याचे संकेतही मनोज जरांगे पाटील यांन दिले.

advertisement

इतर महत्त्वाच्या बातमी:

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आर्थिक स्थैर्य मिळणार,व्यवसायात नवीन संधी,महाशिवरात्रीला या 4 राशींवर कृपादृष्टी
सर्व पहा

Devendra Fadnavis Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीने जातीय समीकरण जुळवलं, ओबीसी-मराठा समाजाचे किती मंत्री?

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Manoj Jarange Patil On Chhagan Bhujbal : ''तो प्युअर येडपट, काहीही बरळतो'', मनोज जरांगेंचा भुजबळांवर पलटवार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल