Devendra Fadnavis Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीने जातीय समीकरण जुळवलं, ओबीसी-मराठा समाजाचे किती मंत्री?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Cabinet Expansion : महायुती सरकारने आपल्या मंत्रिमंडळ विस्तारात प्रादेशिक समतोल राखताना जातीय समीकरणंदेखील जुळवली आहेत. मंत्रिमंडळात ओबीसी आणि मराठा मंत्र्यांची संख्या समसमान पातळीवर आहे.
मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 21 दिवस झाल्यानंतर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला. नागपूरमधील राजभवनात पार पडलेल्या सोहळ्यात 39 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. महायुती सरकारने आपल्या मंत्रिमंडळ विस्तारात प्रादेशिक समतोल राखताना जातीय समीकरणंदेखील जुळवली आहेत. मंत्रिमंडळात ओबीसी आणि मराठा मंत्र्यांची संख्या समसमान पातळीवर आहे. विधानसभा निवडणुकीत ओबीसी आणि मराठा समाजाने महायुतीकडे मतदान केल्याचे समोर आले होते.
विधानसभा निवडणुकीत महायुतीकडे मोठ्या प्रमाणावर ओबीसी मतदार वळला असल्याचे दिसून आले. तर, मराठा आरक्षणातील जरांगे इफेक्ट कमी करण्यासाठी मराठा उमेदवारही उतरवण्यात आले होते. त्याच्या परिणामी दोन्ही समाजांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या आमदारांचा समावेश मंत्रिमंडळात करण्यात आला आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळातील 42 मंत्र्यांपैकी 16 मराठा समाजाचे मंत्री आहेत. तर 17 ओबीसी समाजातील विविध जातींमधील आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ब्राह्मण समाजाचे 2 जण मंत्रिमंडळात आहेत. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचे प्रत्येकी दोन जणांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. तर मुस्लीम समाजाचे एक आणि जैन समाजाची पार्श्वभूमी असणारे 1 मंत्री आहेत. ओबीसीमध्ये माळी समाजाचे 2, कुणबी समाजाचे 3, बंजारा समाजाचे 2 आणि वंजारी समाजाचे 3 मंत्री आहेत.
advertisement
राज्य मंत्रिमंडळातील समीकरण:
मराठा समाजाची पार्श्वभूमी असणारे मंत्री :
1) राधाकृष्ण विखे पाटील, 2) चंद्रकांत पाटील, 3) नितेश राणे, 4) शिवेंद्रराजे भोसले, 5) मेघना बोर्डीकर, 6) आशिष शेलार, 7) एकनाथ शिंदे, 8) शंभूराज देसाई, 9) योगेश कदम, 10) भरत गोगावले, 11) प्रकाश आबिटकर, 12) दादा भुसे, 13) अजित पवार, 14) बाबासाहेब पाटील, 15) मकरंद पाटील, 16) माणिकराव कोकाटे.
advertisement
ओबीसी समाजाची पार्श्वभूमी असणारे मंत्री :
1) गिरीश महाजन (गुर्जर), 2) चंद्रशेखर बावनकुळे (तेली), 3) पंकजा मुंडे (वंजारी), 4) प्रताप सरनाईक (कुणबी), 5) अतुल सावे (माळी), 6) जयकुमार गोरे (माळी), 7) पंकज भोयर (कुणबी), 8) गणेश नाईक (आगरी), 9) आकाश फुंडकर (कुणबी), 10) अदिती तटकरे (गवळी), 11) दत्ता भरणे (धनगर), 12) धनंजय मुंडे (वंजारी), 13) गुलाबराव पाटील (गुर्जर) 14) संजय राठोड (बंजारा), 15) इंद्रनील नाईक (बंजारा), 16) आशिष जयस्वाल (कलाल) 17) जयकुमार रावल (राजपूत)
advertisement
अनुसूचित जाती समाजाची पार्श्वभूमी असणारे मंत्री :
1) संजय सावकारे (चर्मकार) 2) संजय शिरसाट (बौद्ध)
अनुसूचित जमाती : 1) अशोक उईके (आदिवासी) 2) नरहरी झिरवाळ (आदिवासी)
मुस्लीम : हसन मुश्रीफ
जैन : मंगलप्रभात लोढा
ब्राह्मण : 1) देवेंद्र फडणवीस, 2) उदय सामंत (गौड ब्राह्मण)
खुला प्रवर्ग : माधुरी मिसाळ (सीकेपी)
इतर संबंधित बातमी:
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 16, 2024 1:09 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Devendra Fadnavis Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीने जातीय समीकरण जुळवलं, ओबीसी-मराठा समाजाचे किती मंत्री?