Manoj Jarange Live update:विखे पाटील यांच्यासह शिष्टमंडळाने जरांगेंची भेट घेतली आणि बऱ्याच मागण्या मान्य केल्या आहे. हैदराबाद गॅझेटसह प्रमुख मागण्या मान्य केल्या आहे. तासाभरात सरकारडून जीआर काढण्यात येणार आहे. त्यानंतर जरांगे उपोषण सोडणार आहे. मुंबईतील या आंदोलनाचे संपूर्ण लाईव्ह अपडेट्स वाचा.
मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. मनोज जरांगेंनी कालपासून पाणीही सोडलं. आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगेंनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मंगळवारी जरांगेंच्या उपोषणासंदर्भात अत्यंत महत्त्वाची सुनावणी पार पडली. कोर्टाने राज्य सरकारची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. आता सुनावणी ही बुधवारी होणार आहे. तर दुसरीकडे सरकारकडून विखे पाटील यांच्यासह शिष्टमंडळाने जरांगेंची भेट घेतली आणि बऱ्याच मागण्या मान्य केल्या आहे. हैदराबाद गॅझेटसह प्रमुख मागण्या मान्य केल्या आहे. तासाभरात सरकारडून जीआर काढण्यात येणार आहे. त्यानंतर जरांगे उपोषण सोडणार आहे.
News18
advertisement
September 02, 20256:10 PM IST
अखेर पाचव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं
शेवटची क्षणी जरांगे पाटलांची नवी मागणी, फडणवीसांनी उपोषण सोडायला यावे
शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या, त्याबद्दल त्यांचे आभार, पण आमच्या मनात एक इच्छा आहे. आमचे उपोषण सोडवायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावे. जर हे सगळे उपोषण सोडवायला आले तर तर माझे आणि फडणवीसांचे वैर संपले. जर फडणवीस उपोषण सोडायला आले नाही तर माझे आणि त्यांचे वैर राहिल, असे जरांगे पाटील म्हणाले.
त्यावर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, आज तुम्ही उपोषण सोडा. एकदा शासकीय अध्यादेशाची अंमलबजावणी सुरू झाली की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तुम्हाला भेटतील. त्यावर, उपोषण सुटल्यावर मी कुणाला जवळ येऊ देत नसतो, असे जरांगे पाटील म्हणाले.
September 02, 20254:43 PM IST
मराठे जिंकले! जरांगेंनी थेट GRचा शब्द न् शब्द वाचला A टू Z
September 02, 20254:35 PM IST
मनोज जरांगेंनी लढाई जिंकली, तासाभरात जीआर निघणार, रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई मोकळी करणार
– तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो
– मागण्या मान्य झाल्या की, सगळे मराठे आनंद व्यक्त करत मुंबईच्या बाहेर पडतील
– एक तासात सर्व जीआर काढा आणि आमच्याकडे घेऊन या
– त्यानंतर अंतिम निर्णय सांगू
सरकारने एकूण 3 जीआर काढावेत
– सातारा, हैदराबाद गॅझेटियरचा वेगवेगळा जीआर
– आणि आमच्या इतर मागण्यांचा वेगळा जीआर काढावा
– सर्वकाही सुरुळीत झाले तर रात्री 9 वाजेपर्यंत सर्व मराठे मुंबई मोकळी करतील
advertisement
September 02, 20254:28 PM IST
मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा, जीआर आल्यावर आज रात्रीच मुंबई सोडणार
मनोज जरांगे पाटील यांनी अखेर राज्य सरकारच्या मागण्या केल्या मान्य, जीआर काढल्यानंतर आज रात्रीच मुंबई सोडणार
September 02, 20254:14 PM IST
जरांगेंनी अर्धी लढाई जिंकली, राज्य सरकारकडून अनेक मागण्या मान्य
राज्य सरकारकडून विखे पाटील यांच्यासह शिष्टमंडळाने जरांगेंची भेट घेतली आणि बऱ्याच मागण्या मान्य केल्या आहे. यामध्ये हैदाराबाद गॅझेटियरची मागणीही मान्य केली आहे. तसंच सप्टेंबर अखेरपर्यंत आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार आहे. मराठा आणि कुणबी एकच असल्याची घोषणा करण्यासाठी सरकारने एक महिन्याचा वेळ मागितली आहे.
September 02, 20254:09 PM IST
मुंबईतील APMC मार्केट राहणार बंद, मनोज जरांगेंसाठी माथाडी कामगार मैदानात
बुधवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांचा आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी माथाडी कामगारांनी बाजारपेठ बंदची हाक दिली असून व्यापाऱ्यांनी देखील हमी दर्शवली आहे.
advertisement
September 02, 20253:32 PM IST
मोठी बातमी!90 टक्के मराठा आंदोलकांनी मुंबई सोडली
90 टक्के आंदोलक मुंबईबाहेर गेले आहेत,अशी माहिती मनोज जरांगे यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी कोर्टाला दिली आहे.
– माझ्या अशिलाने सर्व वाहनांना मुंबईबाहेर काढण्याचे आदेश दिलेत
– कॅबिनेट सचिव माझ्या अशिलाला भेटण्यासाठी जात आहेत
– आणि माझ्या सूचना आहेत की काहीतरी तोडगा निघेल
– मी म्हणू शकतो की 90 टक्के निदर्शक निघून गेले आहेत
September 02, 20253:12 PM IST
पोलिसांच्या कारवाईवर आंदोलक संतप्त...
मुंबई: पोलिसांकडून आंदोलकांना वाहने काढण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, मराठा आंदोलकांची समजूत काढताना त्यांची दमछाक होत आहे.
September 02, 20253:05 PM IST
हायकोर्टाने दिलेली मुदत संपली, आंदोलक अजूनही आझाद मैदानात आणि परिसरात...
मुंबई: हायकोर्टाने आंदोलक आणि पोलिसांना दिलेली मुदत संपली आहे. तीन वाजेपर्यंत आझाद मैदान रिकामे करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, आझाद मैदान आणि परिसरात अजूनही आंदोलक आहेत. पोलिसांकडून आंदोलकांची वाहने रस्त्यांवरून हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
advertisement
September 02, 20252:06 PM IST
Manoj Jarange Live update: मुंबई पोलीस अॅक्शन मोडवर, दीड तासात जागा रिकाम्या करण्यासाठी मराठा आंदोलकांना सूचना
पोलिसांकडून माईकने सूचना, गाड्या हटवण्याच्या सूचना
जागा रिकाम्या करण्याच्या पोलिसांकडून मराठा आंदोलकांना सूचना
दीड तासात मुंबई सीएसएमटी ते आझाद मैदान रिकामे करण्यासाठी कारवाई सुरू
September 02, 20251:16 PM IST
Jarange Live update: कोर्टाने राज्य सरकारवरही ओढले ताशेरे
न्यायमूर्ती –
कालच्या सुनावणी नंतर तुम्ही राज्य सरकारने काय काम केले ..
पोलिसांनी मोबाईल व्हॅनचा डेटा सादर करावा ..
तुम्ही लाऊडस्पिकरच्या मदतीने अनाऊसमेंट केली का ..
तुम्ही कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई करण्यात अयशस्वी
लोकांच्या मनात भिती निर्माण झाली लोक घराबाहेर पडताना विचार करताय शाळा महाविद्यालयांना सुट्टी द्यावी लागली
September 02, 20251:12 PM IST
Manoj Jarange Live update: मराठा आंदोलनावर न्यायमूर्ती काय म्हणाले?
हे फारच गंभीर आहे
राज्य सरकारकडून देखील काही त्रुटी झाल्या का ?
मुंबईत जी परिस्थिती निर्माण झाली ती सहन करण्यासारखी नाही
आंदोलकांनी तात्काळ जागा रिकामी करावी, अन्यथा आम्हाला कारवाई करावी लागेल
advertisement
September 02, 20251:11 PM IST
Manoj Jarange Live update: मराठा आंदोलकांची बाजू मांडणाऱ्या वकिलाने कोर्टात मागितली माफी
ॲड सतीश मानेशिंदे – काही लोकांकडून त्रास होत आहे. त्यासाठी आम्ही माफी मागतो
September 02, 20251:11 PM IST
Manoj Jarange Live update: मराठा आंदोलनावर कोर्टात सुनावणी, नेमकं काय घडतंय?
कोर्ट काय म्हणाले?
फक्त ५ हजार लोकांना आझाद मैदानावर परवानगी ..मग उर्वरित लोकांना तुम्ही सुचीत करायला हवं ..
५० हजार ते १ लाख लोक मुंबईतील रस्त्यांवर आले आहेत..
प्रसार माध्यमांच्या मदतीने ज्यादा लोकांनी परत जावे असे आम्ही सुचीत केले
वाहनांची वाहन मालकांची माहीत तुम्हाला द्यावी लागेल
September 02, 202510:21 AM IST
Manoj Jarange Live update: मी मेलो तरी मुंबई सोडणार नाही...
मी तर मेलो तरी आझाद मैदानातून हटणार नाही
त्याचे दुष्परिणाम तो आणि मराठे जाणो
कुठल्याही थराला गेला तरी मागण्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय मी इथून हटणार नाही
मराठ्यांचा संयम पाहू नका, गाड्या पार्किंगला लावा, रेल्वेनं आणि एसटीनं प्रवास करा. शांत राहायचं सांगितलं, येड्यावानी करायचं नाही.
ही लढाई शांततेनं लढायची आणि जिंकायची, मी मरेस्तोवर मुंबई सोडणार नाही, फक्त कारण देऊ नका, न्यायालयाच्या नियमांचं पालन करावं
न्यायदेवता आपल्या बाजूनं उभी राहील. आपल्यावर अन्याय करणार नाही