TRENDING:

'विझलो जरी मी...', पत्नीचा नगरपालिकेत पराभव, दुसऱ्याच दिवशी कट्टर मनसे नेत्याचा मृत्यू, वाशीममध्ये हळहळ!

Last Updated:

कारंजा नगर पालिका निवडणुकीत पत्नीचा पराभव झाल्यानंतर दोनच दिवसात मनसे पदाधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वाशिम: "विझलो जरी मी, हा माझा अंत नाही... पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही", अशी भावनिक फेसबूक पोस्ट लिहिणाऱ्या मनसेच्या कट्टर पदाधिकाऱ्याचा दुसऱ्याच दिवशी मृत्यू झाला. कारंजा येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी हरिश हेडा यांचं भीषण अपघातात निधन झालं आहे. कारंजा नगरपालिका निवडणुकीत पत्नीच्या पराभवानंतर त्यांनी ही पोस्ट लिहिली होती, मात्र ही पोस्ट त्यांची शेवटची पोस्ट ठरली आहे.
News18
News18
advertisement

नेमकी घटना काय?

बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास कारंजा-वाशिम बायपास जवळील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ हा भीषण अपघात झाला. हरिश हेडा यांनी आपल्या मुलीला शिकवणी वर्गातून घरी सोडले आणि त्यानंतर काही कामासाठी ते बायपासच्या दिशेने गेले होते. यावेळी एका भरधाव पिक-अप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, हरिश हेडा यांचा जागीच मृत्यू झाला.

advertisement

पराभवानंतरही दाखवली जिद्द

कारंजा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत हरिश हेडा यांच्या पत्नी अलका हेडा रिंगणात होत्या. दोन दिवसांपूर्वीच या निवडणुकीचा निकाल लागला, ज्यामध्ये त्यांचा पराभव झाला. राजकीय आयुष्यातील या धक्क्याने खचून न जाता, हरिश हेडा यांनी मंगळवारी सोशल मीडियावर एक अतिशय सकारात्मक पोस्ट शेअर केली. मतदारांचे आभार मानत त्यांनी पुन्हा लढण्याची जिद्द व्यक्त केली. या पोस्टनंतर २४ तासांच्या आत त्यांच्या मृत्यूची बातमी धडकल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

advertisement

२००८ पासून मनसेशी एकनिष्ठ

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
चिकन, मटणपेक्षा महाग झाली ही भाजी, प्रोटीनच्या बाबतीत मासेही काहीच नाही!
सर्व पहा

हरिश हेडा हे राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन २००८ पासून मनसेमध्ये सक्रिय होते. पक्षाच्या पडत्या काळातही त्यांनी कारंजा शहरात मनसेचा झेंडा हाती ठेवला होता. एक निष्ठावान कार्यकर्ता गमावल्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये दुःखाचे वातावरण आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'विझलो जरी मी...', पत्नीचा नगरपालिकेत पराभव, दुसऱ्याच दिवशी कट्टर मनसे नेत्याचा मृत्यू, वाशीममध्ये हळहळ!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल