राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझी कुठलीही चर्चा नाही. मी मुंबईत यासाठी चाललोय उपोषणकर्त्ंयासोबत काही चर्चा होते का? मी माध्यमातून बघितलं त्यांची चर्चेची तयारी आहे. मला कोणीही मुंबईला बोलावलं नाही आणि जरांगे यांच्यासोबत माझी कुठलीही चर्चा नाही माझी आवश्यकता भासल्यास मी मुंबईत उपस्थित पाहिजे यासाठी मी मुंबईला चाललो आहे
advertisement
महाविकास आघाडीच्या नेत्यांना आरक्षणापेक्षा राजकारण महत्त्वाचे :राधाकृष्ण विखे पाटील
मराठा उपसमितीची कुठलीही बैठक अद्याप मुंबईत ठरली नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांना आरक्षणापेक्षा राजकारण महत्त्वाचे वाटते. मनोज जरांगे पाटील सकाळी मुंबईत पोहचले आहेत माझा त्यांच्यासोबत संपर्क झाला तर मी त्याच्याशी चर्चा करेल, असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
वेळेची मुदतवाढ हा प्रशासनाचा विषय : राधाकृष्ण विखे पाटील
आंदोलनाला दिलेल्या परवानगीची मुदत वाढवण्यासंदर्भात पोलिसांना पत्र दिले यावर बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, हा निर्णय न्यायालयाचा आहे. वेळेची मुदतवाढ हा प्रशासनाचा विषय आहे. मुदतवाढ आणखी दिली तरी बसायचं काही कारण आहे असं मला वाटतं नाही. जरांगे यांच्यासोबत अद्याप कुठलीही चर्चा झालेली नाही. चर्चा झाली तर जरांगे पाटील यावर काय निर्णय घेतात त्यानंतर ठरेल, असेही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
मुदतवाढ मिळणार का?
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी केवळ एक दिवसासाठी परवानगी दिली होती.
ती मुदत आता संपणार आहे. त्यामुळे आता सगळ्या नजरा मुंबई पोलिसांकडे लागल्या आहे. पोलीस आंदोलनाला दिलेल्या परवानगीची मुदत वाढवणार का? पोलिसांनी परवानगी नाकारल्यास जरांगे पाटील कोणती भूमिका घेणार? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलिसांनी आंदोलनाला परवानगी देताना काही अटीशर्ती घातल्या होत्या. त्यामुळे पोलीस कोणती भूमिका घेणार हे महत्वाचं आहे.
हे ही वाचा :