प्रिया (नाव काल्पनिक आहे) 25 वर्षांच्या विवाहित असून घरी ब्यूटी पार्लर सुरू केला होता. व्यवसाय वाढवण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत 10 लाखांचे कर्ज घेण्यासाठी तिने जिल्हा उद्योग केंद्रात अर्ज केला. अर्ज मंजूर झाल्यानंतर फाइल पंजाब नॅशनल बँकेच्या सिडको शाखेत पाठवली. तेव्हा मॅनेजर येळणे यांनी तिचा मोबाइल क्रमांक घेतला. कर्ज मंजूर होईल, असे सांगून व्हॉट्सॲपवरून संपर्क ठेवला. एक दिवस फोन करून हॉटेलमध्ये 8 ऑगस्ट 2024 रोजी त्यांनी सिडको बसस्थानकाजवळील बोलावले. कर्ज मंजूर झाले आहे, असे सांगून समर्थनगर येथील लॉजवर नेले. तिथे जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला.
advertisement
त्यानंतर ब्यूटी पार्लर सुरू कर, असे सांगून तिच्या एसबीआय खात्यावर स्वतःच्या आयसीआयसीआय बँक खात्यातून 76 हजार आणि 75 हजार रुपये पाठवले. 3 सप्टेंबर 2024 रोजी चिकलठाणा परिसरातील लॉजवर पुन्हा बोलावले. कर्ज मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे, असे सांगून पुन्हा अत्याचार केला. यावेळीही तिच्या खात्यावर 90 हजार रुपये ट्रान्सफर केले. 6 ऑक्टोबर 2024 रोजी आरोपीने तिला दौलताबाद परिसरातील फॉर्महाऊसवर नेले. कर्ज मंजूर झाले आहे, पत्र दाखवतो, असे सांगितले. तिथेही तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याच वेळी पीडितेचा ओळखीचा सिद्धार्थ ठोकळ अचानक तिथे पोहोचला. त्याने आरोपीला रंगेहाथ पकडले. या सर्व प्रकारांनंतरही आरोपी येळणे याने स्वतःवरील आरोप झाकण्यासाठी जवाहरनगर पोलिस ठाण्यात पीडितेविरुद्ध खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केला, असेही तक्रारीत नमूद आहे.
