4 ते 5 चकली, 7 ते 8 खजूर, एक ते दीड चमचा लाल तिखट, एक चमचाभर लिंबाचा रस, चवीप्रमाणे मीठ आणि पाणी एवढं साहित्य तुम्हाला चकलीसाठी लागतं. सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये खजूर टाकून घ्यायचे त्यामध्ये तिखट टाकायचं. तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही यामध्ये प्रमाण कमी जास्त करू शकता. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं लिंबाचा रस टाकायचा आणि पाणी टाकून घ्यायचं. हे सर्व साठलेलं साहित्य एकदम बारीक रित्या मिक्सरमधून काढून. एकदम बारीक पेस्ट झाली पाहिजे, चटणी तयार आहे.
advertisement
एका मोठ्या बाऊलमध्ये चकली टाकून घ्यायची आणि त्यावरून जी आपण चटणी केलेली आहे ती टाकून घ्यायची सर्व एकत्र एकजीव करून घ्यायचं. चटणी जी आहे ती पूर्णपणे आपल्या चकल्या आहेत त्यांना लागली पाहिजे म्हणजे चांगलं कोटिंग झालं पाहिजे चटणीच जेणेकरून चव चांगली. आणि जी मसाला चकली आहे ती अशा सोप्या पद्धतीने मोजून पाच मिनिटांमध्ये बनवून तयार होते. तर तुम्ही घरी देखील ही चकली नक्की ट्राय करा तुम्हाला देखील नक्कीच अशी आवडेल.