कळंब पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पेट्रोल पंपावर मध्यरात्री कोयत्याचा धाक दाखवून दरोडेखोरांनी सुमारे सव्वातीन लाखाची रोकड लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. कळंब शहरातील येरमाळा रोडवरील राजश्री पेट्रोल पंपावर हा सशस्त्र दरोडा पडला.
चोरीचो ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून हे सीसीटीव्ही फुटेज न्यूज 18 लोकमत च्या हाती लागले आहे. चार दरोडेखोरांनी पंपावरील कामगारांना ऑफीसच्या चाव्याची मागणी केली मात्र कामगार चावी देत नसल्यानं कोयत्याचा धाक दाखवून दरोडा टाकला. यामध्ये दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावरील 3 लाख 28 हजार रुपयांची रोकड लंपास केली.
advertisement
दरम्यान ही घटना सिसिटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून अवघ्या चार मिनिटात दरोडा टाकून दरोडेखोरांनी रोकड लंपास केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत असून 24 तासानंतर ही कुठलाच सुगावा लागलेला नाही.