TRENDING:

Abdul Sattar : आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसाबेगम यांचे निधन, माजी नगराध्यक्षांच्या निधनाने सिल्लोडमध्ये शोककळा

Last Updated:

Abdul Sattar Passed Away: आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पत्नी तसेच सिल्लोड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा नफिसाबेगम अब्दुल सत्तार यांचे निधन झाले

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर: सिल्लोड-सोयगाव मतदारसंघाचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पत्नी तसेच सिल्लोड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा नफिसाबेगम अब्दुल सत्तार यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने सत्तार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण सिल्लोड शहरात शोककळा पसरली आहे.
Breaking news
Breaking news
advertisement

नफिसाबेगम यांनी केवळ कौटुंबिक जबाबदाऱ्याच पार पाडल्या नाहीत, तर सिल्लोड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा म्हणून शहराच्या विकासात मोठे योगदान दिले. त्यांच्या कार्यकाळात स्थानिक समस्या सोडवण्यासाठी त्यांनी विशेष पुढाकार घेतला होता. आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रत्येक राजकीय संघर्षात आणि चढ-उतारात त्या त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. सत्तार यांच्या यशात नफिसाबेगम यांचा मोठा वाटा असल्याचे मानले जाते.

advertisement

जनतेचा आधारवड हरपला

नफिसाबेगम यांच्या निधनामुळे सिल्लोडमधील जनतेने आपला एक आधारवड गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे. एक संयमी आणि कर्तृत्ववान महिला लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनानंतर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शोक व्यक्त केला आहे.

आज होणार अंत्यविधी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात वाढ, तूर भाव घसरले, कापसाची काय स्थिती? Video
सर्व पहा

नफिसाबेगम यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सिल्लोड येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. त्यांच्या पश्चात पती आमदार अब्दुल सत्तार, मुले, सुना आणि मोठा आप्तपरिवार आहे. आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सिल्लोड मध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी पार पडणार आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Abdul Sattar : आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसाबेगम यांचे निधन, माजी नगराध्यक्षांच्या निधनाने सिल्लोडमध्ये शोककळा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल