बुलढाणा जिल्ह्यातील १० नगरपालिकेचे अध्यक्ष आणि १२२ प्रभागाचे नगरसेवक निवडण्यासाठी सकाळी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. बुलढाणा शहरातील गांधी प्राथमिक शाळेमध्ये असलेल्या मतदान केंद्रावर दुसऱ्याच्या नावावर बोगस मतदान करण्यासाठी आलेल्या तिघा जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच कुणाल गायकवाड यांच्यावरही पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली.
दुबार मतदारांवर कारवाई होणारच
निवडणूक सुरू असतानाच राज्यभरातून तक्रारींचा पाऊस सुरू झाला आहे. त्यातीलच एक धक्कादायक प्रकार बुलडाणा जिल्ह्यात समोर आला आहे इथे एक दुबार मतदार आढळून आला असून स्थानिक नागरिकांनी त्याचा चांगलाच समाचार घेतला..! यापूर्वीही सकाळीच बुलडाणा जिल्ह्यात असे दोन दुबार मतदार पकडले गेले होते. हे लोक चक्क इतरांच्या नावाने मतदान करण्यासाठी आल्याचे उघड झाले. मा. राजसाहेबांनी स्पष्टपणे सांगितल्याप्रमाणे दुबार मतदार आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणारच. हे अशा गैरप्रकार करणाऱ्यांनी ठामपणे समजून घ्यावे.
