अकोला : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्ताव्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. अकोला शहरातील रेस्ट हाऊसमध्ये अमोल मिटकरी थांबलेल्या दालनात कार्यकर्त्यांचा घुसण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाहीतर बाहेर उभी असलेली अमोल मिटकरी यांची गाडीही फोडली. यावेळी कार्यकर्त्यांनी मिटकरी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
काय म्हणाले होते मिटकरी?
advertisement
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर होते. या दरम्यान त्यांनी पूरपरिस्थितीची पाहणी करत नागरिकांची विचारपूस केली होती. यावेळी त्यांनी अजित पवारांवर टीका केली होती. अजितदादा पुण्याचे पालकमंत्री असताना धरणातून इतकं पाणी आलं, अशी मिश्किल टिप्पणी राज ठाकरेंनी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी उत्तर दिलंय. मिटकरींनी राज ठाकरेंना अप्रत्यक्षरीत्या टीका करत सुपारी बहाद्दर म्हणून म्हटलं होतं. तसंच, महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यंतचे सर्वात अयशस्वी ठरलेल्या अजित पवारांबद्दल बोलू नये, असा इशाराही अमोल मिटकरींनी दिला होता. तर NDRF चा लाँग फॉर्म माहीत नसेलेल्या व्यक्तीने आपती व्यापस्थपनावर बोलण म्हणजे सर्वात मोठा जोक आल्याचा टोलाही मिटकरींनी लगावला होता.
आई-बहिणीवर अश्लिल शिवीगाळ केली- मिटकरी
दरम्यान, ‘कुंड्या आणि फ्लॉवरपॉट उचलून गाडीची काच फोडली. काच फोडल्यानंतर मी तिकडे नाही ते लक्षात आल्यानंतर हे गुंड गुलमोहोर कक्षातून खूर्च्या तोडून दरवाजाला लाथा मारून तिथे आले. अर्धा तास त्यांनी माझ्या आई-बहिणीवर अश्लिल शिवीगाळ केली. बाहेर निघाल्यावर तुला जीवाने मारून टाकू अशी धमकी दिली. अत्यंत हिंस्र शस्त्र त्यांनी लपवली होती. चाकू, अॅसिड हल्ल्याचाही त्यांचा प्रयत्न होता, असं आम्हाला कळत आहे. संध्याकाळी माझं घर पेटवून द्यायचा प्रयत्न होता. मी दुपारीच गेल्यामुळे माझ्या घरच्यांवरचं संकट माझ्यावर ओढवलं. मी गाडीत नसल्यामुळे सुरक्षित राहिलो’, असा आरोप मिटकरींनी केलाय.