नेमकी कुठे आणि का झाली हाणामारी?
समोर आलेल्या माहितीनुसार, खासदार धैर्यशील माने आणि आमदार पुत्र राहुल आवाडे या दोघांच्या वाहन चालकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. कोल्हापूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यासाठी पालकमंत्री मंत्री हसन मुश्रीफ पुरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यासाठी कोल्हापुरात आले होते. त्यावेळी या दोन्ही वाहनचालकांमध्ये हसन मुश्रीफांसमोरच फ्री स्टाईल हाणामारी झाली. या दोघांनी सुरूवातील एकमेकांना शिवीगाळ केली आणि नंतर बेल्टने एकमेकांना मारहाण केल्याचं समोर येत आहे.
advertisement
कारण काय?
नेत्यांचा दौरा म्हटलं की धावपळ आलीच, याच धावपळीत दोन्ही नेत्यांची वाहन पार्किंग करत असताना एकमेकाला घासल्याने वाहन चालकांमध्ये वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, दोघांनी एकमेकांना शिवीगाळ तर केलीच शिवाय एकमेकांना बेल्टने मारहाण केली. दोन्ही वाहनचालकांनी एकमेकांचे कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. आता नेतेमंडळी या दोन्ही वाहनचालकांना काय समज देणार? अशी चर्चा सुरू झाली आहे.
कोल्हापुरातील पुरस्थितीचा आढावा घेण्यासाठी होता दौरा:
कोल्हापूर जिल्ह्यात संततधार पावसामुळे सध्या पुरस्थिती उद्भवली आहे, अलमट्टी धरणातील विसर्गासाठी सातत्याने कर्नाटक सरकारसोबत बोलणी चालू आहे. अशावेळी पुरस्थितीचा आढावा घेण्यासाठी हसन मुश्रीफ दौऱ्यावर होते. यावेळी लोकप्रतिनिधी या नात्याने खासदार धैर्यशील माने आणि राहुल आवाडेंनी हजेरी लावली होती. त्यावेळी ही घटना घडली.