महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. वर्ष २०२६ करिता आयोगाच्या http://mpsc.gov.in आणि http://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर प्रस्तावित वेळापत्रक जाहीर करण्यात आल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अवर सचिव ओतारी यांनी सांगितले.
कोणत्या परीक्षांचे आयोजन?
प्रस्तावित वेळापत्रकानुसार वर्ष 2026 मध्ये राज्य सेवा मुख्य परीक्षा 2025, महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा-2025, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2025, महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा-2025, महाराष्ट्र गट- ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा-2025, महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा-2025, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा-2026, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त परीक्षा-2026 व महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा-2026 या परीक्षा घेण्यात येणार आहेत.
advertisement
मतमोजणी दिवशी परीक्षा होणार?
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ (MPSC Group B Prelims 2025) ही २१ डिसेंबर २०२५ रोजी होणार होती, पण निवडणूक मतमोजणीमुळे ती पुढे ढकलण्याची शक्यता आहे. परंतु परीक्षार्थींना अजूनही याविषयी कोणताही संदेश देण्यात आलेला नाहीये. त्यामुळे ते संभ्रमात आहेत.
