औरंगजेब हे नाव आज भारतीयांमध्ये आदराने घेतले जात नाही. त्याच्या कबरीबद्दल कुणाला आस्था असण्याचे कारण सुद्धा नाही. पण या औरंगजेबाची कबर कशी आहे? याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. खुलताबाद येथे औरंगजेबाची कबर त्याचा मुलगा आजम शाहने बांधली. कबरीसाठी औरंगजेबाने स्वतःच्या स्व-कमाईमधून खरेदी केली आणि कबर बांधणीच्या खर्चाचे नियोजन सुद्धा स्वकमाईमधूनच करून ठेवले होते.
advertisement
औरंगजेबाची कबर सुरुवातीला कशी होती?
या कबरीला मजार म्हणावे की मकबरा याबद्दल संभ्रम आहे. मजार ही सुफी संतांची असते, औरंगजेब हा संत नव्हता. तसेच औरंगजेबाला सुद्धा आपल्या समाधीला भव्य दिव्य असे स्वरूप द्यायचे नव्हते. म्हणूनच या कबरीला सुरुवातीला लाकडाच्या जाळ्या आणि वर चुन्याचा लेप होता.
औरंगजेबाची कबर त्याचा मुलगा आझमशाह याने बांधली
आज औरंगजेब भारतीयांच्या नजरेत क्रूरकर्मा आहे. पण त्याच्या साध्या राहणीमानाची दखल इतिहासाने घेतली. औरंगजेबाचा मृत्यू ३ मार्च, १७०७ साली अहमदनगर येथे झाला. त्याचा मुलगा आझमशाह याने खुलदाबाद येथे औरंगजेबाची कबर उभारली.
औरंगजेबाचा मृत्यू नगरमध्ये झाला, मग समाधी औरंगाबादला (छत्रपती संभाजीनगरला) का?
खुलदाबाद हे समाधींचे गाव म्हणून ओळखले जाते. आपला दफनविधी आपले आध्यात्मिक गुरु सय्यद ज़ैनुद्दीन शिराज़ी यांच्या खुलदाबादमधील दर्ग्याजवळ करावा, अशी औरंगजेबाची मृत्यूपूर्व इच्छा होती. तसेच अंतिम संस्कार होताना कोणताही गाजावाजा होऊ नये, अशीही त्याची इच्छा होती. समाधीही एकदम साध्या पद्धतीने बांधावी, जी त्याच्या स्वकमाईच्या पैशातून असेल. त्याच्या इच्छेचा मान ठेवून त्याच्या मुलाने म्हणजेच आझमशाहने औरंगजेबाची समाधी अवघ्या १४ रुपये १२ आणे इतक्या पैशात उभारली. हे पैसे औरंगजेबाने स्वतः टोप्या विणून व विकून मिळविले होते.
औरंगजेबाची कबर मोडकळीस आलेली, निजामाने साधेपणा जपत तिची डागडुगी केली
औरंगजेबाची कबर दीडशे वर्षांपूर्वी मोडकळीस आली होती. एका उच्चपदस्थ इंग्रज अधिकाऱ्याने कबरीला भेट दिली आणि निजामाला दुरावस्थेची कल्पना दिली. त्यानंतर निजामाने कबरीचा साधेपणा जपत तिची डागडुगी केली. औरंगजेबाने आधीच सांगितल्या प्रमाणे भरजरी वस्त्र र त्याच्या कबरीवर चढवली जात नाहीत. वर्षातून एकदा साधे पांढरे कापड चढवले जाते. कबरीच्या नावावर उरूस किंवा भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन नसते.
