छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ मुंबई हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. सुमारे १८५० एकर परिसरात विस्तारलेले विमानतळ भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.
याच विमानतळावर अकासा कंपनीचे विमान पार्क असताना कार्गो वाहनाने धडक दिली.
विमानाच्या पंखांना कार्गोने धडक दिल्याने काही प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे. विमानतळ प्रशासनाकडून सध्या चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.
advertisement
मुंबई : अहमदाबाद विमानाच्या अपघाताचे व्रण मिटलेले नसताना मुंबई विमानतळावर अकासा कंपनीच्या विमानाला अपघात झाला आहे. कार्गो वाहनाची विमानाच्या पंखाला धडक बसल्याची प्राथमिक माहिती आहे.
छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ मुंबई हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. सुमारे १८५० एकर परिसरात विस्तारलेले विमानतळ भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.
याच विमानतळावर अकासा कंपनीचे विमान पार्क असताना कार्गो वाहनाने धडक दिली.
विमानाच्या पंखांना कार्गोने धडक दिल्याने काही प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे. विमानतळ प्रशासनाकडून सध्या चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.
थर्ड पार्टी ग्राऊंड हँडलर, मालवाहू ट्रक चालवत असताना, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभ्या असलेल्या अकासा एअर विमानाच्या संपर्कात आला, जे विमान पार्क केलेले होते, असे एअरलाइनच्या प्रवक्त्याने सांगितले. विमानाची सध्या कसून तपासणी सुरू आहे आणि आम्ही थर्ड पार्टी ग्राउंड हँडलरसह या घटनेची चौकशी करत आहोत, असेही प्रवक्त्याने सांगितले.
(लवकरच सविस्तर बातमी...)