TRENDING:

VIDEO कॉल करून 'ती' थेट विवस्त्र झाली, मुंबईचा बिझनेसमॅन अडकला जाळ्यात, पुढे घडलं भयंकर

Last Updated:

सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीशी मैत्री करणं मुंबईतील एका ५० वर्षीय उद्योजकाला चांगलंच महागात पडलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीशी मैत्री करणं मुंबईतील एका ५० वर्षीय उद्योजकाला चांगलंच महागात पडलं आहे. फेसबुकवर मैत्री झालेल्या एका महिलेने व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉलदरम्यान उद्योजकाला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून तब्बल १ लाख २० हजार रुपये उकळल्याची धक्कादायक घटना गोरेगाव परिसरात घडली आहे. या प्रकरणी उद्योजकाने अखेर बांगूरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
प्रातिनिधीक फोटो
प्रातिनिधीक फोटो
advertisement

व्हिडिओ कॉल आणि ब्लॅकमेलिंगची सुरुवात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव येथील एका व्यावसायिकाची फेसबुकवर एका अनोळखी महिलेशी मैत्री झाली होती. मैत्री अधिक वाढल्यावर व्यावसायिकाने त्या महिलेला आपला मोबाइल क्रमांक दिला. त्यानंतर त्या महिलेने व्यावसायिकाला व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ कॉल केला. या कॉलदरम्यान ती महिला अचानक कपडे काढताना दिसली. ही गोष्ट लक्षात येताच, व्यावसायिकाने तातडीने तो कॉल बंद केला. परंतु, हा कॉल त्यांच्यासाठी मोठा धोकादायक ठरला.

advertisement

दिल्ली पोलिसांच्या नावाने धमक्या

या घटनेच्या काही दिवसांनंतर त्या महिलेनं त्यांच्या संभाषणाचं स्क्रीन रेकॉर्डिंग पाठवून क्लिप व्हायरल करण्याची धमकी दिली. यानंतर विविध मोबाइल क्रमांकावरून व्यावसायिकाला धमक्या द्यायला सुरुवात झाली. या धमक्यांमध्ये एका महिलेने तर स्वतःला दिल्ली पोलिसांमधील अधिकारी असल्याचे भासवत पैशांची मागणी केली. आपली बदनामी होईल या भीतीमुळे उद्योजकाने सुरुवातीला सुमारे १५ हजार रुपये तत्काळ पाठवले.

advertisement

मागणी न थांबल्याने पोलिसांत धाव

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुळाची झाली भाव वाढ, केळी आणि आल्याची आज काय स्थिती? Video
सर्व पहा

पहिल्या मागणीनंतर पुढील काही आठवड्यांमध्ये ब्लॅकमेल करणाऱ्यांनी सतत धमक्या देऊन त्याच्याकडून एकूण १ लाख २० हजार रुपये उकळले. इतके पैसे देऊनही पैशांची मागणी थांबत नसल्याचे आणि धमक्या सुरूच असल्याचे लक्षात आल्यावर, आपली फसवणूक झाल्याचे व्यावसायिकाच्या लक्षात आले. अखेर उद्योजकाने बांगूरनगर पोलीस ठाण्यात सायबर फसवणूक आणि खंडणीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलीस आता विविध क्रमांकांवरून धमक्या देणाऱ्या सायबर गुन्हेगारांचा शोध घेत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
VIDEO कॉल करून 'ती' थेट विवस्त्र झाली, मुंबईचा बिझनेसमॅन अडकला जाळ्यात, पुढे घडलं भयंकर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल