नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, २६ जानेवारीनिमित्त आंबेडकर नगरमध्ये सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी परिसरात मोठे स्पीकर्स लावले होते. यावेळी ही ३ वर्षांची मुलगी परिसरात खेळत असताना अचानक एक मोठा स्पीकर तिच्या अंगावर कोसळला. हा आघात इतका भीषण होता की, चिमुकली गंभीर जखमी झाली. स्थानिक नागरिकांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
advertisement
सीसीटीव्ही फुटेजमध्ये नेमकं काय?
या दुर्घटनेमागे एका चिंध्या गोळा करणाऱ्या व्यक्तीचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे प्राथमिक आरोप होत आहेत. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली आहे. डोक्यावरून चिंधीचं मोठं गाठोड घेऊन जात असताना गाठोडं हे वायरमध्ये अडकलं आणि स्पीकर पडला. नेमकं त्याच वेळेस ३ वर्षांची चिमुकली पळत येत होती. यावेळी स्पीकर तिच्या अंगावर पडला. सीसीटीव्हीमध्ये अंगाचा थरकाप उडवणारे दृष्य कैद झाले आहेत. त्यामध्ये स्पीकर कशामुळे पडला याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. एका व्यक्तीच्या चुकीच्या हालचालीमुळे हा जड स्पीकर तोल जाऊन थेट मुलीच्या अंगावर पडल्याचे बोलले जात आहे.
>> सीसीटीव्हीमधील दृष्ये तुम्हाला विचलित करू शकतात...
एका छोट्या चुकीमुळे चिमुकलीचा जीव गेल्याने कुटुंबाला प्रचंड धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
