महिलांचा आणि तरुण मतदारांची संख्या वाढली...
विशेषतः महिला आणि युवा मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्यामुळे हा नवमतदारवर्ग कुणाच्या बाजूने झुकतो, यावरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा निकाल ठरणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. सत्ताधाऱ्यांपासून विरोधकांपर्यंत सर्वच पक्ष आता नव्या मतदारांवर लक्ष केंद्रीत करताना दिसत आहेत.
उत्तर नागपूर मतदारसंघात सर्वाधिक वाढ
advertisement
माजी मंत्री, काँग्रेस नेते नितीन राऊत यांच्या उत्तर नागपूर मतदारसंघात सर्वाधिक 14,671 नवमतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघात राऊत यांच्यासमोर आव्हान वाढण्याची शक्यता आहे.
हिंगणा आणि कामठीतही मोठी वाढ
हिंगणा आणि कामठी या मतदारसंघांमध्ये प्रत्येकी 11 हजारांहून अधिक नवमतदारांची नोंद झाली आहे. हे दोन्ही मतदारसंघ नागपूरच्या राजकीय पटलावर निर्णायक मानले जातात. त्यामुळे येथील मतदारांची वाढलेली संख्या कोणत्या पक्षाला फायदा करून देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 पर्यंतची यादीच ग्राह्य
राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 पर्यंतची मतदार यादीच अंतिम मानली जाणार आहे. त्यामुळे त्या तारखेपर्यंत नाव नोंदवलेले नागरिकच मतदान करू शकतील.
नागपूर जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या
या नव्या नोंदणीमुळे नागपूर जिल्ह्यातील एकूण मतदारसंख्या 45,97,343 इतकी झाली आहे. यामध्ये पुरुष, महिला आणि तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. 80 हजार नव्या मतदारांमुळे या निवडणुकांमध्ये पारंपरिक मते आणि सत्ता समीकरणं दोन्ही बदलण्याची शक्यता आहे.
