TRENDING:

मध्य रेल्वेच्या लोको पायलटने संपवलं जीवन, नागपुरातील खळबळजनक घटना

Last Updated:

नागपूर येथील रेल्वे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका लोको पायलटने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नागपूर: मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर येथील रेल्वे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका लोको पायलटने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली आहे. या घटनेमुळे रेल्वे विभागात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. एका लोको पायलटने रेल्वे विभागाच्या रुग्णालयात अशाप्रकारे जीवन संपवल्याने सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
sudhakar chunarkar death
sudhakar chunarkar death
advertisement

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या लोको पायलटचं नाव सुधाकर चुनारकर असं असून, ते मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी होते. काही दिवसांपूर्वी राहत्या घराच्या बाथरूममध्ये पडून ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर योग्य उपचार व्हावेत, या उद्देशाने त्यांना नागपूरच्या रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातील एका खोलीत त्यांच्यावर उपचार सुरू होते.

advertisement

उपचारादरम्यान उचलले टोकाचे पाऊल

शुक्रवारी (२७ मार्च २०२६) सुधाकर चुनारकर यांनी सर्वांची नजर चुकवून रुग्णालयातील आपल्या खोलीत गळफास घेतला. ही बाब रुग्णालयीन कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने डॉक्टरांना पाचारण केलं, मात्र दुर्दैवाने तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांनी हे टोकाचे पाऊल नेमके का उचललं, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही.

advertisement

रेल्वे प्रशासनाकडून चौकशीचे आदेश

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबू इतके महाग का झाले, द्राक्षाची काय स्थिती? मार्केटमधून मोठी अपडेट
सर्व पहा

घटनेची माहिती मिळताच विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी (DRM) तातडीने रेल्वे रुग्णालयात धाव घेतली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. या घटनेमुळे रेल्वे कर्मचारी संघटनेत हळहळ व्यक्त केली जात आहे. रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, या संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असे स्पष्टीकरण दिले आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मध्य रेल्वेच्या लोको पायलटने संपवलं जीवन, नागपुरातील खळबळजनक घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल