मुंबईला डबे पोहोचवणाऱ्या बापाचा मुलगा जसा मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक झाला असून तो आता गाडा हाकणार आहे. तसं आणखी एक डोळ्यात पाणी आणणारी नागपूरच्या पठ्ठ्याची कहाणी आहे. घरात परिस्थिती साधी आणि वडील महानगरपालिकेत शिपाई म्हणून काम करत आहेत. ज्या महानगरपालिकेत वडील शिपाई म्हणून काम करतात तिथेच आता त्यांचा मुलगा नगरसेवक होणं वडिलांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्या विजयाने कुटुंबियांच्या डोळ्यात पाणी आलं.
advertisement
नागपूर महानगरपालिकेचे निकाल हाती आले आहेत. नागपुरात पुन्हा भाजपने गड राखला आहे. प्रभाग क्रमांक 31 मधून गणेश चर्लेवार विजयी झाला आहे. त्याचे वडील नागपूर महानगरपालिकेत शिपाई म्हणून कार्यरत आहेत. गणेश चर्लेवार यांना भाजपकडून तिकीट देण्यात आलं होतं. ते संघाचे कट्टर स्वयंसेवक आहेत, त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर आनंदाचं वातावरण होतं. शिवसेनेनेच्या कोट्यातून भाजपने त्यांना तिकीट दिलं आणि त्यांनी विजय मिळवला आहे. त्यांच्या विजयानंतर परिसरात मोठा जल्लोष करण्यात आला. गुलाल उधळून विजय साजरा झाला.
नागपूरमध्ये भाजपने सलग चवथ्यांदा विजय मिळविल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संध्याकाळी 7 वाजता नागपूरमध्ये विजयी जल्लोषात सहभागी होणार आहेत. नागपूर हा भाजपचा गड समजला जातो. त्यामुळे नागपुरातला हा विजय फार महत्त्वाचा आहे.
नागपूर महानगरपालिका
एकुण जागा- 151
भाजप- 103
शिवसेना- 02
राष्ट्रवादी- 01
ठाकरे- 02
काँग्रेस- 31
मनसे-00
शरद पवार गट- 00
MIM - 07
मुस्लीम लीग - 04
