उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. नागपूरमध्ये पूर्व आणि दक्षिण पश्चिम मतदारसंघ मागितले आहे, दक्षिण पश्चिममध्ये फडणवीसांची स्थिती खराब आहे, आमच्याकडे सक्षम उमेदवार आहे, मला पक्षाने संधी दिली तर दक्षिण पश्चिम मधून निवडणूक लढणार असं देशमुख यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. 1 महिन्यापूर्वी आचारसंहिता लागायला हवी होती, सरकार निवडणुकांना घाबरत आहे. जागा वाटपाचा आमचा निर्णय झाला आहे, लवकरच यादी जाहीर होईल. सरकार निवडणुकीच्या तोंडावर अनेक घोषणा करत आहे, अनेक महामंडळांची घोषणा केली. दिलेल्या घोषणा पूर्ण करण्याचा भाजपचा अनुभव नाही
advertisement
महागाई वाढली आहे, सोयाबीन शेती पिकाला भाव नाही, तरुणाला काम नाही त्यामुळे जनता नाराज आहे, निवडणुकीची वाट पाहत आहे. दिल्लीवरून फोन आला वेदांता फिक्सकोन नागपूरला नाही गुजरातला लागेल, फडणवीस यांची नाही म्हणायची हिम्मत झाली नाही, असा टोला देशमुख यांनी लगावला आहे. दरम्यान येत्या तीन ते चार दिवसांमध्ये प्रक्रिया पूर्ण करून महाविकास आघाडीची यादी जाहीर करू असंही यावेळी देशमुख यांनी म्हटलं आहे.