नागपूर - नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे दरवर्षी नवरात्रीमध्ये मोठा उत्सव असतो. या ठिकाणी नवरात्रीमध्ये अतिशय आकर्षक असे देखावे तयार केले जातात. काही ठिकाणी देखाव्याची सजावट बघण्यासारखी असते. तसेच काही ठिकाणी जिवंत देखावे सुद्धा येथे दाखवले जातात. नवरात्री सुरू झाली की अमरावती जिल्ह्यातील अनेक लोकांना काटोल येथे जाण्याची घाई असते. कारण दांडिया स्पर्धा, मोठी यात्रा आणि सुंदर देखावे हे या ठिकाणचे आकर्षण ठरते. नवरात्रीच्या निमित्ताने काटोल येथील काही देखाव्यांची माहिती आपण जाणून घेऊयात.
advertisement
1. काटोल येथे श्री आदर्श माताराणी मंडळाच्या वतीने सुंदर देखावा तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी एक गुफा तयार करून त्याच्या आतमध्ये 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन तुम्हाला घेता येते. त्यानंतर त्याच गुफेमध्ये माता महाकालीचे दर्शन सुद्धा तुम्हाला घेता येईल.
2. शारदीय नवरात्र दुर्गोत्सव धंतोली येथे त्यांनी दृकश्राव्य देखावा तयार केलेला आहे. एका स्लाईडवर रामायणाचे दृश्य दाखवून कथा ऐकवल्या जात आहे.
3. सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळ यांनी विठूमाऊलीच्या स्वरूपात देखावा तयार केलेला आहे. त्याला कलरफुल रनिंग लायटिंग असल्याने ते दृश्य अतिशय आकर्षक दिसते.
4. नागपूर जिल्ह्यातील पारडशिंगा येथे सती अनुसया मातेचे सुंदर मंदिर आहे. या मंदिरात वर्षभर सुद्धा भक्तांची गर्दी असते. पण नवरात्रीमध्ये विशेष पूजा असल्याने अधिक गर्दी बघायला मिळते. त्याच ठिकाणी सुंदर गार्डन सुद्धा आहे. जिथे लहान मुलांना खेळायला जागा, तरुणांना फोटोशूटसाठी उत्तम जागा सुद्धा आहे. नवरात्रीमध्ये तुम्हीही याठिकाणी नक्की भेट देऊ शकता.