अध्यक्षांनी निर्देश देऊन सुद्धा कारवाई नाही
मी लक्षवेधी मांडली होती. आत्तापर्यंत दोन लक्षवेधी मांडली. ग्रामीण भागातील अनेक आमदारांचा विषय आहे. कुठंही गेलं तरी महिला भगिनी आम्हाला प्रश्न विचारतात. आपण लाडक्या बहिणी म्हणतो.. पण आपल्या बहिणीचं दु:ख आहे अवैध दारूवर आळा घातला नाही, याचं दु:ख आहे. अध्यक्षांनी निर्देश देऊन सुद्धा कारवाई झाली नाही तर याचा काय अर्थ? हा चिंतेचा विषय आहे, असं अभिमन्यू पवार यांनी म्हटलं आहे.
advertisement
लाडक्या बहिणींचे पैसे चालूच राहतील - फडणवीस
मी पुन्हा सदस्यांना सांगतोय की, पुन्हा लाडकी बहिण आणू नका. लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊ नका... नाहीतर घरी बसावं लागेल. लाडक्या बहिणींचे पैसे चालूच राहतील. ती योजना सुरूच राहिल. या योजनेला इतर योजनेसोबत तुलना करता येणार नाही. जर अध्यक्षांनी काही निर्देश दिले असतील आणि त्यावर कारवाई करण्यात आली नसेल तर तात्काळ ती करण्यात येईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
ज्योती गायकवाड यांच्याकडून लाडक्या बहिणीचा उल्लेख
दरम्यान, फलटणच्या महिला डॉक्टर प्रकरणाची चर्चा सुरू असताना काँग्रेस आमदार ज्योती गायकवाड यांनी देखील लाडक्या बहिणीचा उल्लेख केला होता. त्यावरून देवेंद्र फडणवीसांनी रोष व्यक्त केला होता. लाडक्या बहिणींचा आणि इतर प्रकरणांचा काय संबंध? असा सवाल त्यांनी यावेळी विचारला.
