प्रोटीन, हेल्दी फॅट्स, फायबर, मॅग्नेशियम, झिंक आणि अँटिऑक्सिडंट्स हे सर्व घटक भोपळ्याच्या बियांमध्ये मुबलक प्रमाणात असतात. हे घटक शरीराची ताकद वाढवण्यास, ऊर्जा टिकवून ठेवण्यास आणि अनेक कार्ये सुरळीत ठेवण्यास मदत करतात. हेल्दी फॅट्स आणि मॅग्नेशियममुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. हृदयावरचा ताण कमी होऊन हृदयाचे आरोग्य सुधारते.
‘इन्स्टा’ ग्रुपवर का येत नाही? टोळक्यानं तरुणाला गाठलं, विटा, दांडके अन् चाकू, सोलापुरात भयंकर घडलं!
advertisement
ट्रिप्टोफॅन नावाचा घटक झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करतो. अनियमित झोप असणाऱ्यांसाठी भोपळ्याच्या बिया उपयुक्त ठरू शकतात. फायबर जास्त असल्यामुळे पचन सुरळीत राहते. बद्धकोष्ठता आणि पोटफुगी कमी होण्यास मदत होते. झिंक आणि अँटिऑक्सिडंट्समुळे सर्दी-खोकला आणि इतर संक्रमणांपासून शरीराचे संरक्षण होते. प्रतिकारशक्ती वाढवते. थोड्या बिया खाल्ल्या तरी पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते. त्यामुळे अनावश्यक खाणे कमी होते. आपले वजन नियंत्रण राहते.
भोपळ्याच्या बिया कशा खाव्यात?
भोपळ्याच्या बिया खाण्याचे अनेक सोपे मार्ग आहेत. सकाळी रिकाम्या पोटी एक ते दोन चमचे बिया खाऊ शकता. सॅलड, दही, उपमा, पोहे किंवा ओट्सवर वरून टाकून खाल्ल्यास चव आणि पौष्टिकता वाढते.
भोपळ्याच्या बियांचे हलके भाजलेले स्नॅक्सही उपलब्ध असतात, तेही सहज खाता येतात. स्मूदीमध्ये किंवा शेकमध्ये एक चमचा बिया घातल्यास ती अधिक पौष्टिक होते. भोपळ्याच्या बियांचे चटणी किंवा पावडर बनवून दाल-भात, भाज्यांमध्येही वापरता येते. काहीजण या बियांचा ट्रेल मिक्स करून बदाम, काजू, मनुका यांसहही वापर करतात. या सर्व पद्धती साध्या आहेत आणि दैनंदिन आहारात सहज समाविष्ट करता येतात.
भोपळ्याच्या बियांमध्ये असलेले व्हिटॅमिन्स आणि खनिजे शरीरातील सूज कमी करतात, त्वचेला पोषण देतात आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. योग्य प्रमाणात सेवन केल्यास सर्व वयोगटातील लोक याचा फायदा घेऊ शकतात.





