‘इन्स्टा’ ग्रुपवर का येत नाही? टोळक्यानं तरुणाला गाठलं, विटा, दांडके अन् चाकू, सोलापुरात भयंकर घडलं!
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Solapur News: इन्स्टा ग्रुपवर येत नसल्याच्या कारणाने टोळक्याने तरुणाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात घडला आहे.
सोलापूर: सध्याच्या काळात सोशल मीडियावरून होणारे वाद नवे राहिले नाहीत. परंतु, सोलापुरात नुकतीच एक धक्कादायक घटना घडलीये. इंस्टाग्राम अकाउंटवर न येण्यावरून 10 ते 15 जणांच्या टोळक्याने एका तरुणाला विटा आणि दांडक्याने मारहाण केलीये. सुफियान इम्रान आतार असे जखमी तरुणाचे नाव असून याप्रकरणी जेलरोड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
नेमकं घडलं काय?
आतार याला इन्स्टाग्रामवर 04 या नावाने असलेल्या अकाउंटवर येण्याचा आग्रह केला जात होता. परंतु, ग्रुपमध्ये न आल्याच्या रागातून 10 ते 15 जणांच्या टोळक्याने त्याला विटाने आणि दांडक्याने मारहाण केली. तसेच चाकूचे वार करून शिवीगाळ करत त्याला गंभीर जखमी केले. ही घटना 9 डिसेंबर रोजी सोलापूर शहरातील पोटफाडी चौक येथे घडली.
advertisement
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मोहम्मद साहब जावेद शेख (वय 30, राहणार राहुल गांधी झोपडपट्टी) याचं पोटफाडी चौक या ठिकाणी फळ विक्रीचा व्यवसाय आहे. घटनेच्या दिवशी नेहमीप्रमाणे फळ विक्री करत होता. तेव्हा सायंकाळी शेखच्या मामाचा मुलगा सुफियान इम्रान अत्तार फळ विक्री स्टॉलवर आला. काही वेळ दोघांनी गप्पा मारल्या आणि दुकान बंद करून ते घरी निघाले.
advertisement
टमटममधून घरी जाताना पोटफाडी चौक बाहुबली कारपेठच्या समोर आले असताना तीन ते चार मोटरसायकलवरून साहिर शेख, हैदर शेख, जिलानी शेख, दाऊद शेख, सैफन शेख, समीर रोकडे व इतर 10 ते 12 जण अचानक आले. तसेच तू आमच्या 04 नावाने इंस्टाग्राम अकाउंटवर का येत नाही? असा सवाल केला आहे. हाच राग मनात धरून सुफियान इम्रान आतारला विटाने, दांडक्याने मारहाण सुरू केली. तसेच साहिर शेखने त्याच्या हातातील चाकूने हातावर व कपाळावर मारून गंभीर जखमी केले. तर या मारहाणीमध्ये मोहम्मद साहब शेख आणि सर्फराज शेख हे देखील जखमी झाले आहेत.
advertisement
याप्रकरणी मोहम्मद साहब शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून समीर रोकडा, जिलानी शेख, सिकंदर शेख, आसिफ शेख, साहिर शेख, दाऊद अशपाक शेख व इतर 10 ते 12 जणांविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चानकोटी हे करत आहेत.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Dec 11, 2025 11:01 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
‘इन्स्टा’ ग्रुपवर का येत नाही? टोळक्यानं तरुणाला गाठलं, विटा, दांडके अन् चाकू, सोलापुरात भयंकर घडलं!









