मुंबई कोलकत्ता अर्थात जुना नागपूर-अमरावती महामार्गावर मोर्शी फाट्याजवळ लहानुजी बाबा या नावाने हॉटेल आहे. सध्याचे मालक सागर खुरटकर यांच्या वडिलांनी सुरू केले. गेली 27 वर्षापासून सुरू असलेला त्यांचा हा व्यवसाय आजही लोकप्रियता टिकवून आहे. सध्या दिवसाला 400 ते 500 प्लेट नाश्त्याची ची विक्री होत आहे. आम्ही नाश्त्याची चव आणि गुणवत्ता कायम ठेवली आहे. त्यामुळे सकाळी 6 वाजल्यापासूनच ग्राहकांची गर्दी सुरू होते, असे खुरटकर सांगतात.
advertisement
संपूर्ण महाराष्ट्रात फेमस आहे 'ही' कुरकीत जिलेबी, पाहूनच आवरणार नाही मोह
हे हॉटेल आमच्या वडिलांनी आणि मोठ्या भावाने मिळून सुरू केले होते. मुख्य महामार्गावर असल्यामुळे या रस्त्याने प्रवास करणारा व्यक्ती येथे नाष्टा करून पुढचा प्रवास करत असतो. आमच्या नाश्त्याची चव आणि गुणवत्तेमुळे इथं आलेला ग्राहक समाधानी होतो असं त्यांनी सांगितलं.
फक्त गव्हाच्या पिठापासून बनवा बाप्पासाठी नैवेद्य, 5 मिनिटात तयार होईल पदार्थ
काय आहे यशाचा फॉर्म्युला?
आमच्या लहानुजी बाबा या हॉटेलमध्ये नाश्त्याचे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. त्यात सकाळच्या वेळी वैदर्भीय आलू गोंडा, पालक वडा, तर्री पोहा, मिसळ, भजे आदी पदार्थ मिळतात. तर दुपारी कचोरी, समोसा, सांबार वडा आणि शनिवार, गुरुवार, अशा विशेष उपवासाच्या दिवसाला साबुदाणा वडा, साबुदाणा खिचडी, हे उपवासाचे पदार्थ मिळतात. यासोबतच आमच्या येथील मठ्ठा हा प्रसिद्ध आहे.स्वच्छता, नाश्त्याची गुणवत्ता आणि ग्राहकांचे आदरातिथ्य हा गुरुमंत्र आमच्या वडिलांनी दिलाय. आम्ही त्यानुसार आजही काम करत आहोत, असं सागर यांनी सांगितलं.