फक्त गव्हाच्या पिठापासून बनवा बाप्पासाठी नैवेद्य, 5 मिनिटात तयार होईल पदार्थ

Last Updated:

घरातील गणपतीला रोज कोणता नैवेद्य बनवावा असा प्रश्न पडला असेल. तर घरातीलच केवळ गव्हाच्या पिठापासून हा खास पदार्थ बनवा.

+
फक्त

फक्त गव्हाच्या पिठापासून बनवा बाप्पासाठी नैवेद्य, 5 मिनिटात तयार होईल पदार्थ

वर्धा, 20 सप्टेंबर: नुकताच गणेशोत्सव सुरू झाला असून घरोघरी लाडक्या बाप्पांचं आगमन झालंय. त्यामुळे स्वयंपाकघरात दररोज नैवेद्यासाठी नवनवीन पदार्थांची मेजवानी केली जाते. रोज नैवेद्यासाठी वेगळा पदार्थ कोणता करावा? असा प्रश्न अनेक गृहिणींना पडत असतो. तर वर्धा येथील गृहिणी मीना शिंदे यांनी खास नैवेद्यासाठी घरातील गव्हाच्या पिठापासून झटपट तयार होणारी रेसिपी सांगितली आहे. ही कुरकुरीत गोड शेव आपल्याला नक्कीच आवडेल.
काय लागणार साहित्य?
गोड शेव बनवण्यासाठी घरात उपलब्ध साहित्यच लागणार आहे. यात सर्वात प्रमुख म्हणजे गव्हाचं पीठ अर्धी वाटी, अर्धी वाटी गुळ, तळणासाठी तेल आणि जायफळ, वेलची पावडर या साहित्यात कुरकुरीत रेसिपी तयार होईल.
कशी बनवायची गोड शेव?
सुरुवातीला गव्हाच्या पिठात गरजेनुसार मीठ ऍड करून पोळीसाठी मळतात त्यापेक्षा थोडी कडक मळायचे आहे. त्यानंतर हाताने बारीक शेव करून घ्यायची आहे. तुम्ही शेवच्या साच्यानेही शेव करू शकता मात्र हाताने केलेल्या शेव जास्त चांगले तळता येतात. म्हणून हातानेच बनवून त्याचे लहान लहान तुकडे करून घेतले आहेत. एका बाजूला गुळात अगदी थोडंस पाणी घालून गुळाचा पाक करण्यासाठी गॅसवर ठेवायचं आहे. शेव थोडा वेळ फॅन मध्ये सुकल्यानंतर गरम तेलात मंद आचेवर तळून घ्यायचे आहेत. लालसर कुरकुरीत झाल्यावर घट्ट पाकात टाकून काढून सर्व्ह करायचे. आता गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठीची ही सोप्पी रेसिपी तयार आहे.
advertisement
दहा दिवस गणपती बाप्पा घरोघरी विराजमान असेल. गोडाधोडाचा नैवेद्य करून गणरायाच्या आदरातिथ्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत. मात्र रोज रोज गणपती बाप्पाला कोणता नैवेद्य लावावा असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर अवघ्या 2 वस्तूंपासून अगदी झटपट बनवून तयार होणारी 'गव्हाच्या पिठाची गोड शेव' ही नैवेद्य रेसिपी 10 दिवसांतून एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता.
मराठी बातम्या/रेसिपी/
फक्त गव्हाच्या पिठापासून बनवा बाप्पासाठी नैवेद्य, 5 मिनिटात तयार होईल पदार्थ
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement