काँग्रेसची मागणी असलेल्या जागा
रामटेक, भंडारा गोंदिया, गडचिरोली, अमरावती, चंद्रपूर आणि नागपूर या सहा जागा काँग्रेसच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. तर उबाठा गटाची मागणी असलेल्या जागा यवतमाळ, वाशिम आणि बुलडाणा आहे. शरद पवार गटाने वर्धा लोकसभा मतदारसंघावर आपला दावा सांगितला आहे. ही जागा काँग्रेसच्या वाट्याला असली तरी यावेळी भंडारा गोंदिया ऐवजी ही जागा शरद पवार गट मागत आहे. अकोल्याची जागा वंचित आघाडीला सोडण्यावर महाविकास आघाडीत एकमत आहे.
advertisement
विदर्भात काँग्रेसने 6 जागा मागितल्यावर गेल्या निवडणुकीत शिवसेनेला विजय मिळालेल्या यवतमाळ, वाशिम आणि बुलढण्याच्या जागेवर उबाठाने आपला दावा कायम केला आहे. त्यामुळे या दोन्ही जागा उबाठा तर अकोला वंचित आणि वर्धा लोकसभा शरद पवार गट यांना सोडण्याची तयारी मविआने केली आहे.
वाचा - 'विजय झाला मग पुन्हा उपोषण का?' राज ठाकरेंचा जरांगेंना सवाल, म्हणाले मी तेव्हाच..
काँग्रेस मोठ्या भावाच्या भूमिकेत?
पूर्वीचा काँग्रेसचा गड असलेला विदर्भ बदलत्या परिस्थितीनुसार आता भाजपचा गड झालेला आहे. मविआमध्ये विदर्भात काँग्रेसची उबाठा आणि शरद पवार गट यापेक्षा मोठी ताकद काँग्रेसची आहे. त्यामुळे विदर्भात काँग्रेसने प्रामाणिकपणे आपला मित्र पक्षांना सहकार्य केलं तर निवडणूक लढणे सोपे जाईल. 2019 च्या जागा वाटप फॉर्म्युला यंदा कायम ठेवण्याचा प्रयत्न मविआ या निमित्ताने करत आहे. पण आता राजकीय परिस्थिती बदलली आहे. गेल्या वेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी एकसंघ असल्याने मतदार संभ्रमावस्थेत नव्हता. यंदा मात्र लढायला तुल्यबळ उमेदवार नाही, अशी स्थिती शरद पवार गट आणि उबाठाची आहे. त्यामुळे जागा वाटप फॉर्म्युलावर चर्चा करत बसून वेळ घालवण्यापेक्षा लवकर वाटप करून उमेदवार घोषित करत प्रचाराला सुरुवात करणे आणि कार्यकर्त्यांना ताकद देणे मविआला आवश्यक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.