advertisement

'विजय झाला मग पुन्हा उपोषण का?' राज ठाकरेंचा जरांगेंना सवाल, म्हणाले मी तेव्हाच..

Last Updated:

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणूक, मराठा आरक्षण अशा विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली.

News18
News18
नाशिक, प्रतिनिधी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी लोकसभा निवडणूक, मराठा आरक्षण, ईडी कारवाई, टोल अशा विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली आहे. सर्व जागा लढवाव्यात अशी पक्षातून मागणी आहे, सध्या आमची लोकसभेसंदर्भात चाचपणी सुरू असल्याचं यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच विजय झाला तर मग आता पुन्हा उपोषणाला का बसता असा सवालही त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना केला आहे.
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे? 
माझी एखादी गोष्ट सुरुवातीला कडवट वाटते, पण ती सत्य असते. मी तेव्हाच जरांगे पाटलांना सांगितलं होतं, त्यांची मागणी मान्य होणार नाही. विजय झाला मग पुन्हा उपोषणाला का बसता असा सवाल राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांन केला आहे. आंदोलनात नेमकं काय घडलं हेच आंदोलकांना कळालं नाही. मराठा आरक्षण हा तांत्रिक विषय आहे, आरक्षणाची वस्तूस्थिती समजून घेतली पाहिजे, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
advertisement
लोकसभा निवडणुकीवर प्रतिक्रिया 
दरम्यान यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांचा हा नाशिक दौरा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मानला जात आहे. याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, सध्या चाचपणी चालू आहे, ज्यांची सत्ता आहे, ते पण चाचपणी करतात मग आम्ही नको का करायला? चाचपणीनंतर निर्णय घेतला जाईल. राज्यातील सर्व जागा लढवाव्यात अशी पक्षातून मागणी असल्याचंही राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
'विजय झाला मग पुन्हा उपोषण का?' राज ठाकरेंचा जरांगेंना सवाल, म्हणाले मी तेव्हाच..
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement