TRENDING:

गंगा नदीच्या मातीतून साकारलीय दुर्गा, गरुड पुराणावर आधारित देखावा पाहिलात का?

Last Updated:

बंगालमधील गंगा नदीच्या मातीतून साकारलेली दुर्गा देवीची प्रतिमा नागपूरकरांचे लक्ष वेधून घेत असून गरुड पुराणावर आधारित देखावा पाहण्यासाठी गर्दी होतेय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नागपूर, 19 ऑक्टोबर: देशात शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे सध्या सर्वत्र चैतन्य आणि भक्तिमय वातावरण आहे. देशभरातील सर्व देवींच्या मंदिरांसह दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने सकारलेले आकर्षक देखावे बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र आहे. नागपुरात देखील आपल्या नाविन्यापूर्ण देखाव्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या राणी लक्ष्मी बाई दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने गरुड पुराणावर आधारित अप्रतिम देखावा साकार केला आहे. मानवी जीवनातील सात चक्र असा या देख्याव्याची संकल्पना असून मुळ देवीची मूर्ती खास बंगाल येथून आणण्यात आली आहे.
advertisement

मानवी जीवनातील सात चक्र

आदिशक्तीचा, स्त्रीशक्तीचा आणि महिषासुररुपी संकटांचे मर्दन करण्यासाठी बळ देणारा उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव होय. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आई जगदंबेचा जागर घालत देवीच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण केली जाते. महाराष्ट्रसह देशभरातील देवीचे मंदिरे, शक्तिपीठ भक्तांनी फुलले आहेत. तर अनेक मंडळाच्या वतीने या नवरात्री उत्सवात देखावे साकारून डोळ्यांचे पारणे फेडले आहे. त्याच धर्तीवर नागपुरातील लक्ष्मी नगर, 8 रस्ता चौक परिसरातील मैदानावर राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने गरुड पुराणावर आधारित भव्य मंडप उभारला आहे. विशेष बाब म्हणजे गरुड पुराणानुसार मोक्षप्राप्ती करता शरीरातील सातही चक्रांना जागृत करणे आवश्यक आहे. या संकल्पनेवर आधारित मानवी जीवनातील सात चक्र अशी या देख्याव्याची संकल्पना आहे.

advertisement

हजार किलोमीटरवरून आणली माती, नागपुरात बंगाली कलाकार घडवतात दुर्गा मूर्ती, Video

बंगलाच्या गंगा नदीतील मातीपासून मूर्ती

कलकत्ता येथील 12-15 कलाकारांच्या परिश्रमानंतर हा देखावा तयार झाला आहे. सुरुवातीला कलकत्ता येथील मालदा जिह्यात या भव्य देखाव्याची निर्मिती झाली. त्याच ठिकाणी ही प्रतिकृती उभारण्यात आली होती. त्यानंतर ही नागपूर येथे साकारण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे मंडपात विराजमान झालेली देवी देखील बंगाल येथील कुंभार टोली हा जो प्रख्यात कलाकारांचा परिसर आहे त्या ठिकाणी तयार झाली आहे. ही मूर्ती बंगाल येथून वाहणाऱ्या पवित्र गंगा नदीच्या मातीतून तयार करण्यात आली आहे. बंगाल येथेच तयार झाल्यानंतर ही मूर्ती रस्त्याने नागपूर येथे आली व त्यानंतर मोठ्या श्रद्धेने ती मंडपात विराजमान झाली आहे, अशी माहिती या मंडळाचे मुख्य संयोजक प्रशांत मोहिले यांनी दिली.

advertisement

मनोकामना पूर्ण करणारी आग्याराम देवी, नागपूरच्या नगरदेवीबद्दल माहितीये का?

18 वर्षांपासून नाविन्यपूर्ण देखाव्यांची परंपरा

राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाचे यंदाचे हे अठरावे वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मंडळाच्या वतीने नाविन्यपूर्ण देखाव्याची परंपरा जपली आहे. यंदा आम्ही गरुड पुराणावर आधारित मानवी जीवनातील सात चक्र अशी संकल्पना राबवीत हा देखावा निर्माण केला आहे. मोक्षप्राप्ती करिता शरीरातील सातही चक्रांना जागृत करणे आवश्यक असून सध्या शरीरातील सातही चक्रांचा ताळमेळ राहत नसल्यामुळे समाजात विविध समस्या दिसून येत आहेत. सर्वांना निरोगी आणि स्वस्थ आरोग्य लाभावे यासाठी देवीच्या चरणी आम्ही साकडे घालत आहोत. आकर्षक देखाव्यासह आम्ही अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि लोकउपयोगी उपक्रम देखील या मंडळाच्या वतीने राबवीत असतो, अशी माहिती मोहिले यांनी दिली.

advertisement

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
गंगा नदीच्या मातीतून साकारलीय दुर्गा, गरुड पुराणावर आधारित देखावा पाहिलात का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल