नालासोपारा विधानसभा मतदारसंघात एकाच व्यक्तीचे पाच वेगवेगळ्या मतदार यादीमध्ये वेगवेगळ्या वोटर आयडी क्रमांक वेगवेगळे सिरीयल एकाच व्यक्तीचे आल्यामुळे मतदारयादीमधील घोळ पुन्हा एकदा समोर आला आहे. नुकत्याच नालासोपारातील सुषमा गुप्ता प्रकरणात ज्या ठिकाणचा पत्ता दिला होता. त्या ठिकाणी ती राहतच नव्हती, मात्र, या ठिकाणी ज्या ठिकाणी पत्त्यामध्ये H / २३० विणा सरस्वती नालासोपारा, पूर्व येथे तो राहत होता. मात्र इतर चार ठिकाणी तो कधीच राहिला नव्हता. निवडणूक आयोगाचा कारभार पाहा, या मनीष सुखराज यादव वय २५ याचे फोटो सहित ५ याद्या ज्यामध्ये पत्ता वेगळा असला तरी एकाच रूमचा नंबर पाचही पत्त्यावर आहे.
advertisement
नालासोपाऱ्यात निवडणूक आयोगाकडून 'गोलमाल'
नालासोपारा विधानसभा मतदार संघाची यादी क्रमांक ४२७ आणि नाव १३२ नालासोपारा विभाग क्रमांक आणि नाव विभाग १ आचोळे गावठाण परिसर आहे.
नालासोपारा विधानसभा मतदार संघ यादी क्रमांक ४२० आणि नाव १३२ नालासोपारा विभाग क्रमांक आणि नाव विभाग ४ वेदश्री हाईट एसकेसी शाळेसमोर एव्हरशाईन सिटी लास्ट वसई रोड पूर्व आहे.
नालासोपारा विधानसभा मतदार संघ यादी क्रमांक ४१९ आणि नाव १३२ नालासोपारा विभाग क्रमांक आणि नाव विभाग १ आचोळे गावठाण परिसर आहे.
नालासोपारा विधानसभा मतदार संघ यादी क्रमांक ४३२ आणि नाव १३२ नालासोपारा विभाग क्रमांक आणि नाव विभाग १ आचोळे गावठाण परिसर
नालासोपारा विधानसभा मतदार संघ यादी क्रमांक ४९१ आणि नाव १३२ नालासोपारा विभाग क्रमांक आणि नाव विभाग २ देवकी नगर वीर सावरकर नगर
निवडणूक आयोगाने या ठिकाणी एकाच व्यक्तीचे वेगवेगळे नंबर आणि पत्यांवर मतदार यादीत नाव नोंदणी केल्याने खळबळ मजली आहे. जर निवडणूक आयोगाने वेळीच दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी महापौर रुपेश जाधव यांनी दिला आहे.
