लग्न समारंभासाठी खरेदी केलेल्या स्टील आणि पितळेच्या भांड्यावर नाव टाकण्याचं काम 1978 सालापासून यमनादास कांबळे करत आहे. लग्न, वाढदिवस किंवा स्मृती कार्य यासाठी दिला जाणाऱ्या भांड्यावर शुभेच्छा नाव कोरुन दिले जातात. यमनदास कांबळे हे सोलापूर शहरातील मधला मारुती येथील भांडे गल्लीत एका दुकानाच्या कट्ट्यावर बसून हातामध्ये पोलादी खिळा व एक लोकांनी पट्टी हातात घेऊन नाव करण्याचं काम करत आहे. तसेच मंगल भांडार मध्ये वापरल्या जाणाऱ्या मोठमोठ्या भांड्यावर हाताने नाव कोरण्याचा काम यमनादास कांबळे करत आहेत. घरगुती वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या भांड्यावर हाताने नाव कोरण्यासाठी एका नावाला 20 रुपये घेतले जातात.
advertisement
जर मंगल भांडार मध्ये वापरले जाणारे भांडे असेल तर त्या भांड्याच्या आकारावर एक नाव कोरण्यासाठी 50 ते 70 रुपये घेतले जातात. पितळ, स्टील, स्टीललेस भांडे आणि चांदीवर सुद्धा नाव कोरण्याचं काम यमनादास कांबळे करत आहे. सोलापुरातील मधला मारुती येथील भांडे गल्लीमध्ये जवळपास 50 हून अधिक कारागीर हाताने भांड्यावर नाव कोरण्याचं काम करतात. तर काही कारागीर मराठीतून नव्हे तर इंग्रजी,कन्नड, तेलुगु व उर्दू भाषेत मध्ये सुद्धा भांड्यावर नाव करण्याचं काम करत आहे तर आधुनिक काळात भांड्यावर नाव कोरण्यासाठी मशीन सुद्धा बाजारात आली आहे परंतु मशीनवर नाव करत असताना भांडे हे दाबले जातात. तसेच मशीन ने भांड्यावर नाव कोरल्यानंतर काही दिवसातच ते भांड्यावरून निघून जातात. पण भांड्यावर हाताने नाव कोरल्यास कायमस्वरूपी राहतात. पोलादी खिळा आणि लोखंडी पट्टीच्या साह्याने भांड्यावर नाव कोरण्याची हस्तकला आजही सोलापुरात अनेक कारागिरांनी जिवंत ठेवले आहे.