नेमकी घटना काय?
मुदखेड तालुक्यातील जवळा गावात राहणाऱ्या लखे कुटुंबातील ही हृदयद्रावक घटना आहे. प्राथमिक माहितीनुसार, या कुटुंबातील दोन मुलांनी धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. ही बातमी समोर येत असतानाच, घरी त्यांचे आई-वडील देखील मृतावस्थेत आढळल्याने गावकरी आणि पोलीस प्रशासन चक्रावून गेले आहे. आई-वडिलांचे मृतदेह घरामध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आले आहेत.
advertisement
आत्महत्या की घातपात? पोलिसांकडून तपास सुरू
एकाच कुटुंबातील चार जणांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे. मुलांनी आत्महत्या केली असली तरी, आई-वडिलांनी देखील आत्महत्या केली की त्यांचा घातपात झाला आहे, याचा तपास आता पोलीस करत आहेत. एकाच कुटुंबातील चार जणांचा अशाप्रकारे अंत झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करत आहेत. चारही जणांच्या मृत्यूच्या कारणाचा पोलीस शोध घेत आहेत.
