TRENDING:

महाराष्ट्राला हादरवणाऱ्या लखे कुटूंबाच्या मृत्यूचं गुढ उकललं, रेल्वे स्टेशनवरच्या CCTV मध्ये घटना कैद, चौघांच्या मृत्यूचं कारण काय?

Last Updated:

Nanded Lakhe family death case : मुडखेड तालुक्यातील जवळा मोरार येथे 25 डिसेंबर रोजी एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळले होते. लखे कुटूंबातील चौघांनी टोकाचं पाऊल का उचललं? याची माहिती आला समोर आलीये.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Nanded Crime News : नांदेड जिल्ह्यात झालेल्या एकाच कुटुंबातील चौघांच्या आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं आहे. स्वतःच्या पोटच्या मुलांनीच आई-वडिलांचा गळा दाबून खून करून नंतर आत्महत्या केली होती. आई-वडिलांच्या शुभविच्छेदन अहवालानंतर खरं कारण समोर आलं आहे. तर रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्हीमधून देखील धक्कादायक घटना समोर आली आहे. लखे कुटूंबातील चौघांनी टोकाचं पाऊल का उचललं? याची माहिती आला समोर आलीये.
Nanded Lakhe family death case cctv reveals
Nanded Lakhe family death case cctv reveals
advertisement

लखे कुटूंबातील चौघांचा मृत्यू

मुडखेड तालुक्यातील जवळा मोरार येथे 25 डिसेंबर रोजी एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळले होते. 51 वर्षीय रमेश लखे आणि त्यांची पत्नी 44 वर्षीय राधा लखे या दोघांचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले होते. तर 25 वर्षीय उमेश लखे आणि त्याचा भाऊ 22 वर्षीय बजरंग लखे या दोघांचे मृतदेह मुगट रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे पटरीवर कटलेल्या अवस्थेत आढळले होते. दोन्ही भावाच्या आत्महत्येची घटना रेल्वे स्टेशनवरच्या सीसीटीव्हीमध्ये दिसून आली आहे.

advertisement

आई-वडिलांची हत्या करून मुलांची आत्महत्या

एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह दोन वेगवेगळ्या ठिकाणी आढळल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. सुरुवातीला या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. आई-वडिलांचा मृत्यू गळफास घेतल्याने नव्हे तर गळा दाबल्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झालं आहे. इतर तांत्रिक तपास केला असता मुलांनी अगोदर आई-वडिलांची हत्या करून नंतर आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. वडील रमेश लखे हे 25 वर्षापासून आजारी होते.

advertisement

डोईवर कर्जाचा बोजा अन् उचललं टोकाचं पाऊल

वडिलांच्या उपचारासाठी लागणाऱ्या सततच्या खर्चाला कंटाळून दोन्ही मुलांनी आई-वडिलांचा गळा दाबून खून केल्याचे तपासात समोर आले. शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर नातलगाच्या तक्रारीवरून याप्रकरणी दोन्ही मयत मुलांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पत्नी राधाबाई आणि मुलं बजरंग आणि उमेश हाती जे काम येईल, ते करून घरचा गाडा चालवत होते. परंतू दोन्ही मुलांचं लग्नाचं वय झालं होतं अन् खर्चाचा बोजा वाढत चालला होता.

advertisement

पानटपरी चालकाला उठवून सुपारीची पुडी घेतली

घटनेच्या रात्री दीड ते अडीच वाजेच्या दरम्यान उमेश आणि बजरंग मोटारसायकलवरून घरातून निघाले होते. त्यांनी गावातील एका पानटपरी चालकाला उठवून सुपारीची पुडी घेतली. “आम्हाला बाहेरगावी जायचे आहे,” असे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली.

अवेटेड समरी दाखल

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शनिवारी डाळिंबाला उच्चांकी भाव, शेवग्याचं मार्केट हाललं, गुळाचे दर काय?
सर्व पहा

दरम्यान, या प्रकरणातील आरोपींनी ही आत्महत्या केल्याने याप्रकरणी कुठलीही चार शीट न्यायालयात दाखल न करता अवेटेड समरी दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितलं. आई वडिलांचा खून केल्यानंतर मुलांना पश्चाताप झाला असेल आणि त्यातून त्यांनी रेल्वे खाली येऊन आत्महत्या केली.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
महाराष्ट्राला हादरवणाऱ्या लखे कुटूंबाच्या मृत्यूचं गुढ उकललं, रेल्वे स्टेशनवरच्या CCTV मध्ये घटना कैद, चौघांच्या मृत्यूचं कारण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल