दीक्षा दत्तू त्रिभूवन असं आत्महत्या करणाऱ्या २१ वर्षीय मृत तरुणीचं नाव आहे. दीक्षाने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या तळहातावर ‘आय लव्ह यू मॉम-डॅड’ असं लिहिलं होतं. रविवारी (दि. १८ जानेवारी) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास तिने गळफास घेतल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आलं. तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
advertisement
शांत आणि अभ्यासू स्वभाव
गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीक्षा ही दिव्यांग होती. ती स्वभावाने अत्यंत शांत आणि अभ्यासू होती. तिच्या अशा अचानक जाण्याने त्रिभूवन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या पश्चात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.
पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
या घटनेप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे नेमके कारण काय होते? तिच्यावर काही मानसिक दडपण होते का? या दिशेने पोलीस सध्या तपास करत आहेत. अभ्यासू आणि प्रेमळ दीक्षाने अशा प्रकारे आयुष्य संपवल्याने ध्रुवनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
