नाशिककरांसाठी रोजगार
नाशिक पर्यटनाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. अनेक धार्मिक आणि पर्यटन स्थळे इकडे आहेत. जिल्ह्यातील गड- किल्ल्यांच्या संवर्धनासोबत पर्यटन स्थळांच्या विकासासाठी प्रशासनाकडून जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. ऑक्टोबर 2026 पासून नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरूवात होणार आहे. कुंभमेळ्यासाठी येणार्या भाविकांसाठी सोयी- सुविधांची निर्मिती केली जात आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास केला जात आहे. या माध्यमातूनच पर्यटकांसाठी सोयी- सुविधांचीही निर्मिती केली जात आहे. शिवाय, नाशिककरांना रोजगार निर्मितीही करून दिली जाणार आहे.
advertisement
धार्मिक स्थळांचा कायापालट
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामाचा आवाका मोठ्या प्रमाणावर असणार आहे, त्यामुळे त्याआधीच प्रशासनाकडून प्रत्येक ठिकाणी जोरदार तयारी केली जात आहे. पंटवटी, काळाराम मंदिर, रामकुंड आणि सीता गुंफा या ठिकाणीही पर्यटकांसाठी उत्तम सुविधा केल्या जात आहेत. राहण्याची सोय, हॉटेल्स, पर्यटकांना नाशिकच्या काही खास गोष्टी खरेदी करण्यासाठीचे दुकान असे अनेक रोजगाराच्या संधी इथे उपलब्ध करून दिल्या जात आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणी प्रशासनाकडून रोजगारनिर्मितीचे महत्त्वाचे काम केले जात आहे. परिवहन विभागाकडूनही या ठिकाणी विशेष बस सेवा चालवली जाणार आहे.
गडांचे संवर्धन
भाविकांचे श्रद्धास्थान असणार्या वणीची सप्तश्रृंगी देवी आणि त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग येथे तीर्थ क्षेत्र विकास निधितून पायाभूत विकास कामे केली जात आहेत. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगसाठी 275 कोटींचा आराखडा मंजूर असून, विकासकामाला सुरूवात झाली आहे. वणीच्या सप्तश्रृंगी देवीच्या गडासाठी 81 कोटी 87 लाखांच्या निधीला मान्यता मिळाली असून तिथेही देवीच्या गाभाऱ्यामध्ये सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. त्याशिवाय गडाच्या पायथ्याशीही अनेक विकासकामे केली जात आहेत. नाशिकच्या पर्यटनामध्ये या दोन ठिकाणांचा फार मोठा वाटा आहे. या ठिकाणी पर्यटकांची कायमच रेलचेल सुरू असते.
