TRENDING:

नाशिकमध्ये मोठा पॉलिटिकल ड्रामा! शिंदेसेनेच्या नेत्याची उपमहापौर पदावरुन आधी नाराजी आता थेट नॉट रिचेबल

Last Updated:

Nashik Election 2025 : नाशिक महापालिकेतील उपमहापौर पदाच्या निवडीनंतर शहराच्या राजकारणात अचानक अस्थिरता निर्माण झाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक :  महापालिकेतील उपमहापौर पदाच्या निवडीनंतर शहराच्या राजकारणात अचानक अस्थिरता निर्माण झाली आहे. पक्षांतर्गत मतभेद उघडपणे समोर येऊ लागले असून, काही नेत्यांमधील नाराजी आता टोकाला पोहोचल्याचे चित्र आहे. महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी आपल्यावर अन्याय झाल्याचा आरोप करत पदाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला असून, ते सध्या संपर्काबाहेर असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Nashik Election 2026
Nashik Election 2026
advertisement

नेतृत्वावरील नाराजी उफाळून बाहेर

उपमहापौर पदासाठी प्रवीण तिदमे यांचे नाव आधीपासूनच चर्चेत होते. त्यांनीही या पदासाठी तयारी दर्शवली होती. मात्र ऐनवेळी पक्षाने विलास शिंदे यांना उमेदवारी दिल्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. या निर्णयामुळे तिदमे समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली. निवड प्रक्रियेदरम्यान सभागृहात तणावपूर्ण वातावरण होते, हेही अनेकांच्या लक्षात आले.

निवडीनंतर शिस्तभंगाची कारवाई

advertisement

विलास शिंदे उपमहापौर म्हणून निवडून आल्यानंतर प्रवीण तिदमे उशिरा सभागृहात पोहोचले. याच कारणावरून पक्षाकडून त्यांना शिस्तभंगाची नोटीस देण्यात आल्याचे समजते. या कारवाईमुळे आधीच असलेला असंतोष अधिक तीव्र झाला आणि तिदमे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले.

वरिष्ठ नेत्यांची हालचाल सुरू

घडामोडी गंभीर होताच पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी सक्रिय झाले आहेत. उपमहापौर विलास शिंदे आणि उपनेते अजय बोरस्ते यांनी मुंबईत जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या चर्चांमध्ये सर्व गटांचा समावेश नसल्याने अंतर्गत मतभेद अजूनही कायम असल्याचे स्पष्ट होते.

advertisement

एकनाथ शिंदेंच्या नाशिक दौऱ्याकडे लक्ष

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात नाराज नेत्यांशी थेट संवाद साधून तोडगा काढला जाईल, अशी अपेक्षा पक्ष कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र प्रत्यक्षात काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजीनाम्याचा इशारा आणि संभाव्य परिणाम

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात मोठी वाढ, तूर आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

प्रवीण तिदमे यांनी केवळ महानगरप्रमुख पदाचाच नव्हे, तर नगरसेवक पदाचाही राजीनामा देण्याचा संकेत दिल्यामुळे राजकीय समीकरणे बदलू शकतात. पक्षासाठी सुरुवातीपासून काम करूनही आपल्याला डावलले जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. काही निवडक नेत्यांनाच महत्त्व दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नाशिकमध्ये मोठा पॉलिटिकल ड्रामा! शिंदेसेनेच्या नेत्याची उपमहापौर पदावरुन आधी नाराजी आता थेट नॉट रिचेबल
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल