राहुल धोत्रेच्या हत्याकांड प्रकरणी निमसेसह त्यांच्या कार्यकर्त्यांवर आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. 22 ऑगस्टला धोत्रेवर करण्यात आला प्राणघातक हल्ला होता. त्यानंतर 29 ऑगस्टला उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. जवळपास 20 हून अधिक दिवसापासून निमसे फरार होता. पोलीसांची 4 पथके निमसेच्या मागावर होती. निमसे स्वतःहून हजर झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. निमसे यांच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती. मुख्य आरोपी असलेला उद्धव निमसे पोलिसांच्या हाती 20 दिवसानंतर आला आहे.
advertisement
नेमकं काय आहे प्रकरण?
नाशिकच्या नांदूर नाका परिसरात पायावरून दुचाकी गेल्याने वादाचे कारण ठरत दोन गटात फ्रीस्टाइल हाणामारी झाली होती. पायावरून दुचाकीची चाक गेल्याच्या कारणातून निमसे आणि धोत्रे गटांमध्ये वादाची ही ठिणगी पडली. या हाणामारीत धोत्रे गटातील दोघांवर चॉपरने वार करत डोक्यात दगड घालून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला होता. राहुल धोत्रे आणि अजय हे दोघं गंभीर जखमी झाले होते.मात्र उपचारादरम्यान राहुल धोत्रेचा मृत्यू झाला.
दरम्यान या फ्रीस्टाइल हाणामारीचा सीसीटीव्ही समोर आला होता. दोन्ही गटाचे 15 ते 20 जण जमा होऊन ही हाणामारी झाली होती. या हाणामारीत चॉपर चाकू हॉकी स्टिकचा वापर करण्यात आला होता.