नेमकं प्रकरण काय आहे?
तर हे प्रकरण ब्लॅकमेलिंगचं असल्याचं समोर येत आहे. चार आरोपी एका व्यावसायिकाला ब्लॅकमेल करत होते. त्याचे एका मैत्रिणीसोबतचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन व्यावसायिकाला ब्लॅकमेल केलं जात होतं. मात्र दहा हजार रुपयांचा पहिला हफ्ता घेताना पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं आहे. आरोपींकडून जप्त केलेल्या टॅबमध्ये तब्बल दीडशे ते दोनशे खासगी व्हिडीओ आढळले आहेत.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी नाशिकमधील एका बड्या व्यावसायिकाच्या कार्यालयातून टॅब चोरी केला होता. या टॅबमधील सर्व डेटा मिळवत, आरोपींनी व्यावसायिकाचे मैत्रिणीसोबत असलेले अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत १२ लाखांची खंडणी मागितली होती. या प्रकरणी व्यावसायिकाने संशयितांविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, २ एप्रिल रोजी सकाळी १२ वाजता मोबाइलवर फोन आला. 'मला ७ वाजेपर्यंत ५० हजार रुपये द्या व तुमचा टॅब घेऊन जा', असे संशयित बोलला. व्यावसायिकाने कार्यालयात जाऊन खात्री केली असता टॅब चोरण्यात आल्याचं त्यांच्या लक्षात आलं. चोरट्याकडून टॅबमधील जुन्या मैत्रिणीसोबत असलेले काही खासगी फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन १२ लाखांच्या खंडणीची मागणी केली. त्यापैकी १० हजार रुपये खंडणी म्हणून घेतले गेले. त्याचवेळी पोलिसांनी कारवाई करून ४ जणांना ताब्यात घेतले.
टॅबमध्ये दीडशे ते दोनशे व्हिडिओ
सातपूर पोलिसांनी काही वेळातच संशयित आकाश बकरे, प्रकाश पानपाटील, सूरज गवई, श्रीपत शिंदे यांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीतच टॅबमध्ये दीडशे ते दोनशे व्हिडिओ असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात तक्रारदारावरही संशय व्यक्त करण्यात येत असून, मोठे सेक्स स्कँडल उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
