TRENDING:

गुंगीचं औषध पाजून विवाहितेवर अत्याचार, नाशिकच्या कॅप्टन खरातकडे कोट्यवधींचं घबाड, आकडा वाचून चक्रवाल!

Last Updated:

एका ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी नाशिकमधील प्रसिद्ध ज्योतिषी कॅप्टन अशोक खरातला मंगळवारी मध्यरात्री गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्या आहेत. आता त्याच्याकडे कोट्यवधीचं घबाड सापडलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
एका ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी नाशिकमधील प्रसिद्ध ज्योतिषी कॅप्टन अशोक खरातला मंगळवारी मध्यरात्री गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी खरात हा मागील दोन वर्षांपासून पीडित विवाहित महिलेचं लैंगिक शोषण करत होता. तुझ्या पतीचा मृत्यू होईल, अशी भीती घालून कॅप्टन खरात महिलेवर अत्याचार करत होता. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. यानंतर पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री त्याला कर्मयोगीनगरमधील बंगल्यातून अटक केली.
अशोक खरात
अशोक खरात
advertisement

याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल केला असून, न्यायालयाने त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तो बड्या नेत्यांसह सेलिब्रिटींचे भविष्य सांगत होता. काही दिवसांपूर्वी त्याने एकनाथ शिंदेंचं देखील भविष्य सांगितलं होतं. आता पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडील एका पेन ड्राईव्हमध्ये ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ मिळाले आहेत. यामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे.

advertisement

लष्करी शिस्त अन् सेवेच्या नावाखाली वावरणाऱ्या कॅप्टन अशोककुमारने अंकशास्त्राच्या आधारे राजकीय नेतेमंडळींचंच नव्हे तर प्रशासनातील बडे अधिकारी, खाकी वर्दीतील वरिष्ठांचं भविष्य सांगितलं. यातून त्याने मागील १५ वर्षात तब्बल २०० कोटींची माया जमवली. त्याचे पुरावे एका मराठी वृत्तपत्राने शोधून काढले आहेत. त्याने विविध मोक्याच्या ठिकाणी कोट्यवधी रुपयांच्या जमिनी विकत घेऊन ठेवल्याचं समोर आलं आहे.

advertisement

खरातची मालमत्ता कुठे आहे? त्याची अंदाजित किंमत किती?

एका मराठी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, कॅप्टन खरात याची पाथर्डीत सर्व्हे क्रमांक १३२, १३८, २०३, २२०, ३३, ९३, ९७ मध्ये ३० एकर जमीन आहे. याची अंदाजे किंमत १५० कोटींच्या आसपास आहे. अत्यंत मोक्याच्या ठिकाणी ही जमीन आहे. तसेच कहांडळवाडी, मीरगाव येथे त्याची ४५ एकर जमीन असून याची किंमत २ कोटींच्या आसपास असल्याची माहिती आहे.

advertisement

याशिवाय कॅप्टन खरातने काही मालमत्ता आपल्या कुटुंबीयांच्या नावे देखील केली आहे. पाथर्डीच्या गौळणे शिवारात त्याने पत्नी कल्पना, मुलगी सृष्टी आणि तृप्तबालाच्या नावे ३० कोटींच्या जमीनीचं खरेदीखत केलं आहे. याशिवाय मीरगाव येथे मंदिराच्या मागे त्याचं भव्य फार्महाऊस असून याची किंमत साधरण १० कोटींच्या आसपास आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबाच्या दरात मोठी उसळी, कांद्याने केली आजही निराशा, केळीला काय मिळाला भाव?
सर्व पहा

तसेच इशान्येश्वर मंदिर ट्रस्टची वार्षिक उलाढाल देखील दोन कोटींच्या आसपास आहे. ओझर विमानतळाजवळ त्याची पाच कोटींची जमीन आहे. तसेच त्याला ज्या कर्मयोगीनगरच्या बंगल्यातून अटक केली, तो आलिशान बंगला देखील ५ कोटींच्या आसपास किमतीचा आहे. कॅनडा कॉर्नरच्या ऑफिसची किंमत देखील १ कोटींच्या आसपास आहे. या संपत्तीची सगळी बेरीज केली तर ही सगळी रक्कम अंदाजे २०० कोटींच्या आसपास असून मागील १५ वर्षात त्याने ही सगळी माया जमवली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
गुंगीचं औषध पाजून विवाहितेवर अत्याचार, नाशिकच्या कॅप्टन खरातकडे कोट्यवधींचं घबाड, आकडा वाचून चक्रवाल!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल