राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी नकार दिला आहे आणि जागेबाबत काही ठरलं नाहीय. त्याबाबत मीडियावर चर्चा नको असं छगन भुजबळ यांनी म्हटलं. भुजबळ पुढे म्हणाले की, त्यांचे आमदार मोदी लाटेवर आलेत आणि आमचे त्यांच्या विरोधात निवडून आले आहेत. जो निवडून येईल त्याबाबत ते विचार करतील. दिंडोरीच्या जागेबाबात चर्चा केली. 6 पैकी 4 आमदार आहे. पूर्वी आमचे लोक निवडूनसुद्धा आले आहेत. शिंदेच्या शिवसेने इतक्याच जागा आम्हाला मिळाव्या या मतावर भुजबळ ठाम आहेत.
advertisement
Pune : अजून काय पाहिजे? पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात बॅनर, कष्टाळू कार्यकर्ता कोण?
महसूल विभागाच्यामध्ये प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. नाशिकच्या जागेवर दावा आहे पण पक्ष ठरवेल कोण लढवेल.आम्ही किती कामे केले आहेत ही जागा सुटली पाहिजे आणि नंतर उमेदवार ठरेल असंही भुजबळ यांनी म्हटलं. रामदास कदम यांनी भाजपबाबत केलेल्या वक्तव्यावर भुजबळ म्हणाले की, तशी शार्प प्रतिक्रिया मी देणार नाही. सध्या तरी त्यावर बोलणार नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अरुणाचल प्रदेशमधील त्यांच्या नेत्यांची भेट घेतली. यावरून सध्या अजित पवार आणि शरद पवार यांच्या गटात एकमेकांवर टीका सुरू आहे. छगन भुजबळ यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, तिथले 8 आमदार आमच्यासोबत आहे. लोकसभेसोबत विधानसभा आहे त्यामुळे त्यांनी भेट घेतली. आम्ही तयारी करणार आहे. शरद पवार यांनी दोन गट झाले नव्हते तेव्हा त्यांनी तिथल्या सरकारला पाठिंबा दिला आहे. तेव्हा ते आले होते, त्यांनीही स्वागत केले होते. कोण काय बोलले असेल मला माहिती नाही