मालेगावच्या कल्याण कट्टा भागात पालकमंत्री दादा भुसे यांचा बंगला आहे. याच भागातील एका व्यापाऱ्याच्या घरी दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नागरिकांनी तिघांपैकी दोघांना पकडून चोप दिला. त्यानंतर दोघांनाही पोलिसांच्या हवाली केलं. पालकमंत्री दादा भुसे यांनी या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलीस ठाण्यात जात मालेगावात वाढत्या गुन्हेगारीवर नाराजी व्यक्त केली. आरोपींना कडक शिक्षा देण्याची मागणीही केली.
advertisement
crime : बायकोचा मोबाइल पाहिला, तिने नवऱ्याच्या डोळ्यातच खुपसली कात्री!
दरम्यान, पालकमंत्री दादा भुसे यांचा बंगला असल्यामुळे सेफ झोन मानल्या जाणाऱ्या भागात दरोडा टाकण्याची हिम्मत केली जात असेल तर मग इतर भागाचा काय असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला. शेकडो नागरिक आणि व्यापाऱ्यांनी पोलीस स्टेशनच्या आवारात गर्दी केली होती. पकडण्यात आलेले दोन्ही आरोपी धुळ्याचे असून त्यांची नावे कबीर सोनवणे आणि विलास उर्फ बंटी पाटील अशी आहेत. दोघांविरुद्ध छावणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार झालेल्या आरोपीचा शोध घेतला जात आहे.