TRENDING:

Nashik News: म्हणे नाशिक कायद्याचा किल्ला? मध्यरात्री टोळक्याचा गावावर हल्ला, गावकऱ्यांना मारलं, वाहनं फोडली!

Last Updated:

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यामध्ये यात्रेला एका टोळीने हिंसेचे गालबोट लावले आहे. मध्यरात्रीच्याच वेळी हल्लेखोरांनी गावकऱ्यांवर हल्ला केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक: नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील टोकडे गावामध्ये हल्ल्याची घटना घडली आहे. या हल्ल्याच्या घटनेमध्ये काही गावकरी जखमी झाले आहेत. मालेगावातील टोकडे गावातील दुर्गादेवीच्या जत्रेच्या उत्साहाला हिंसेचे गालबोट लागले आहे. शनिवारी मध्यरात्री 12 च्या सुमारास तमाशाचा फड सुरू असताना एका टोळीने नागरिकांवर हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. या हल्ल्यामध्ये काही गावकऱ्यांसह एका बालकाचा सुद्धा समावेश आहे. हल्लेखोरांनी फक्त गावकऱ्यांवरच हल्ला केला नसून मोठ्या प्रमाणावर घराची नासधूस केली असून बाहेर उभ्या असणाऱ्या वाहनांची सुद्धा त्यांनी तोडफोड केली आहे.
News18
News18
advertisement

नेमकं काय घडलं?

शनिवारी मध्यरात्री टोकडे गावामध्ये जत्रेनिमित्त तमाशाचा फड होता. या कार्यक्रमामध्ये सर्व गावकरी उपस्थित होते. हा कार्यक्रम सुरू असताना मध्यरा‍त्रीच्या वेळी एका टोळीने गावकऱ्यांवर हल्ला केला. 8 ते 10 जणांच्या या टोळक्याने लाठ्या- काठ्या आणि धारदार शस्र घेऊन गावकऱ्यांवर हल्ला केला. फक्त गावकऱ्यांवरच नाही तर, घरांवर आणि वाहनांवर सुद्धा त्यांनी हल्ला केला. घरांच्या खिडक्या आणि दारे सोबतच वाहनांच्या काचांचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्यांनी नासधूस केली. त्यांनी केलेल्या नासधूसीमुळे गावकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

advertisement

अंधाराचा फायदा घेत आरोपी फरार

घटनेच्या वेळी पोलीस पाटलांनी तात्काळ मालेगाव तालुक्यातील पोलीस ठाण्याशी संपर्क साधत घटनास्थळावरून बरेच घातक शस्त्रे ताब्यात त्यांनी घेतले. शिवाय, संशयित गुन्हेगारांनाही मालेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. हल्ला करणाऱ्या टोळीने अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला असून पोलि‍सांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे. या घटनेमध्ये 10 गावकरी जखमी झाले असून जखमींमध्ये एका बालकाचाही समावेश आहे. जखमींवर सध्या मालेगावच्या ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे गावकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
जेवणाला येईल रुचकरपणा, कमी वेळेत बनवा पारंपरिक पाटवडी, रेसिपीचा Video
सर्व पहा

टोकडे गावातील जखमींमध्ये एका चिमुकल्याचाही समावेश असल्याने गावकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर विरोध केला जात आहे. घटनेनंतर गावाला छावणीचे स्वरूप आले आहे. पुन्हा एकदा कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस गावामध्ये तैनात करण्यात आले आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik News: म्हणे नाशिक कायद्याचा किल्ला? मध्यरात्री टोळक्याचा गावावर हल्ला, गावकऱ्यांना मारलं, वाहनं फोडली!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल