प्रत्येक गावातील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची रासायनिक आणि जैविक तपासणी जलजीवन मिशनअंतर्गत केली जाते. त्यातून पाण्याचा नमुना पिण्यास योग्य आहे की नाही, याचा अहवाल प्राप्त होतो. तो केंद्रीय जलशक्ती मंत्रालय संकेतस्थळवरील 'सिटिझन कॉर्नर' https://ejalshakti.gov.in/jjm/citiz en_corner/villageinformation.aspx या विभागात कुणालाही पाहता येतो.
शेतकऱ्यांसह नागरिकांसाठी महत्वाची बातमी! 1,2 गुंठे जमीन खरेदी- विक्रीसाठी नियम जाहीर
advertisement
5 टक्के पाणी आढळले दूषित
प्रत्येक जलस्त्रोताचे पाणी तपासणी अंतर्गत दर महिन्याला परिक्षण केले जाते. त्यासाठी जलसुरक्षा रक्षकामार्फत पाणी नमुने गोळा करून ते तपासणीसाठी जिल्हा प्रयोगशाळेत पाठवले जातात. जूनमधील अहवालानुसार 2 हजार 506 पाण्याच्या नमुन्यांची तपासणी झाली. त्यापैकी 114 गावांचे पाणी नमुने अर्थात सुमारे 5 टक्के पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे निष्पन्न झाले. त्या पार्श्वभूमीवर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देशही सबंधितांना देण्यात आले आहेत.
नाशिकमधील दूषित पाण्याचे नमुने
त्र्यंबकेश्वर (22), सिन्नर (20), येवला (18), बागलाण (9), निफाड (8), सुरगाणा (8), इगतपुरी (6), नांदगाव (5), मालेगाव (5), दिंडोरी (4), कळवण (3), पेठ (3), नाशिक (1), देवळा (1), चांदवड (1).
या तालुक्यांत सर्वाधिक दूषित पाणी
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत जलस्त्रोतांची तपासणी करण्यात येते. त्यात येवला व त्र्यंबकेश्वर तालुक्यात सर्वाधिक दूषित नमुने आढळले असून 55 ग्रा.पं. कडून जलशुद्धीकरणाकडे दुर्लक्ष होत आहे. या ग्रामपंचायतींनी पाणी नमुन्यात क्लोरीनचा 20 टक्के पेक्षा कमी वापर केल्याचे निर्देशना आले आहे. क्लोरिनचा कमी वापर केल्याने हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
क्लोरीनचा वापर अपुरा
जलशुद्धीकरण करताना त्यात, क्लोरीन वापराचे प्रमाण हे 33 टक्क्यांपर्यंत असणे अपेक्षित असते. परंतु, जिल्हा प्रयोगशाळेत पाणी नमुण्यांची तपासणी केल्यानंतर आरोग्य विभागानाला अहवाल प्राप्त झाला. त्यात दूषित 563 नमुन्यातील 55 नमुन्यात संबंधित ग्रामपंचायतींनी क्लोरीनचा 20 टक्क्यांपेक्षा कमी वापर केल्याचे समोर आले आहे.