शेतकऱ्यांसह नागरिकांसाठी महत्वाची बातमी! 1,2 गुंठे जमीन खरेदी- विक्रीसाठी नियम जाहीर
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : महाराष्ट्र सरकारने काही महिन्यांपूर्वी झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये तुकडेबंदी कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता राज्यात एक ते दोन गुंठ्यांच्या जमिनींची खरेदी-विक्री पूर्णपणे कायदेशीर आणि अधिकृत पद्धतीने करता येणार आहे.
मुंबई : महाराष्ट्र सरकारने काही महिन्यांपूर्वी झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये तुकडेबंदी कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता राज्यात एक ते दोन गुंठ्यांच्या जमिनींची खरेदी-विक्री पूर्णपणे कायदेशीर आणि अधिकृत पद्धतीने करता येणार आहे. आतापर्यंत या आकाराच्या जमिनींची नोंदणी परवानगी नसल्याने अनेक व्यवहार बेकायदेशीररित्या होत होते. त्यामुळे अनेक नागरिकांची फसवणूक होत होती आणि भूमाफियांचा पायपसारा वाढत होता. मात्र, नवीन नियमावलीमुळे अशा गैरप्रकारांना आळा बसेल आणि सामान्य नागरिकांना कायदेशीर संरक्षण मिळेल.
नवीन नियमांचे मुख्य मुद्दे
छोटे भूखंड कायदेशीर : यापुढे 1-2 गुंठे जमिनींची खरेदी-विक्री नोंदणीकृत स्वरूपात करता येणार आहे. त्यामुळे खरेदीदार आणि विक्रेते दोघांनाही सरकारी सुरक्षा मिळणार आहे.
प्रशासकीय परवानगी अनिवार्य : व्यवहार करण्यापूर्वी ग्रामपंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेणे बंधनकारक राहील. यामुळे व्यवहारांची योग्य नोंद होईल आणि अनधिकृत बांधकामांवर आळा बसेल.
advertisement
नोंदणी शुल्क आकारले जाणार : लहान भूखंडांच्या नोंदणीसाठी शासनाने एक निश्चित शुल्क ठरवले आहे. हे शुल्क भरल्यानंतरच नोंदणी वैध मानली जाणार आहे. यामुळे शासनाला महसूल मिळेल आणि व्यवहार पारदर्शक राहतील.
ऑनलाइन प्रणालीचा वापर : लहान भूखंडांच्या खरेदी-विक्रीसाठी ऑनलाइन प्रणाली सुरू करण्याची योजना आहे. यामुळे व्यवहाराची सर्व माहिती डिजिटल स्वरूपात जतन केली जाईल आणि फसवणुकीच्या घटना टळतील.
advertisement
भोगवटादार वर्ग-2 चे वर्ग-1 मध्ये रूपांतर : शासनाने भोगवटादार वर्ग-२ मधील जमिनींना वर्ग-1 मध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना जमिनींचे कायदेशीर व्यवहार करण्यास अधिक सुविधा मिळेल.
या निर्णयाचे फायदे
सामान्य नागरिकांना दिलासा : घर बांधण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी कमी जागेची गरज असलेल्या नागरिकांना आता सुरक्षितरीत्या लहान भूखंड खरेदी करता येतील.
advertisement
शेतकऱ्यांना आर्थिक मदत : ज्या शेतकऱ्यांकडे जास्त जमीन नाही, ते आपले लहान भूखंड विकून आर्थिक लाभ घेऊ शकतील.
शासनाला महसूल वाढ : या व्यवहारांमधून शासनाला शुल्काच्या माध्यमातून अतिरिक्त महसूल मिळेल.
गैरव्यवहारांवर नियंत्रण : आतापर्यंत बेकायदेशीररित्या होणाऱ्या व्यवहारांवर आळा बसेल आणि भूमाफियांना थारा मिळणार नाही.
नोंदी अद्ययावत : सर्व व्यवहार नोंदणीकृत व डिजिटल झाल्याने मालमत्ता नोंदी अधिक अद्ययावत आणि पारदर्शक राहतील.
advertisement
ग्रामीण व शहरी भागासाठी महत्वाचा निर्णय
हा निर्णय ग्रामीण आणि शहरी, दोन्ही भागातील लोकांसाठी महत्त्वाचा आहे. शहरांमध्ये गुंतवणुकीसाठी छोटे भूखंड खरेदी करणाऱ्यांना सुरक्षितता मिळेल, तर ग्रामीण भागात लहान जमीन असलेल्या शेतकऱ्यांना कायदेशीररित्या विक्री करून तातडीचा आर्थिक दिलासा मिळेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 28, 2025 10:31 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
शेतकऱ्यांसह नागरिकांसाठी महत्वाची बातमी! 1,2 गुंठे जमीन खरेदी- विक्रीसाठी नियम जाहीर