Navi Mumbai News : बॉयफ्रेंडने नातं तोडलं अन् तरुणीचा टोकाचा निर्णय; धावत्या लोकलमधून खाडीत मारली उडी
Last Updated:
Vashi Creek bridge incident : लोकलमधून जात असताना बऱ्याचदा अनेक अपघाताच्या घटना घडत असतात. मात्र सध्या समोर आलेली घटना पाहून लोकलमधील प्रवाशी हादरले आहेत.
नवी मुंबई : प्रेमप्रकरणातून आजपर्यंत अनेक धक्कादायक घटना समोर आलेल्या आहेत. कुठे प्रियकराने केलेल्या विश्वास घाताने प्रेयसीने जीवन संपवले आहे तर कुठे चक्क प्रेयसीनेच प्रियकराचा काटा काढलेला आहे. सध्या असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे.
नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईमध्ये प्रेमप्रकरणातून एका तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकराने अचानक बोलण आणि संपूर्ण संपर्क तोडल्यामुळे मानसिक तणावात गेलेल्या या तरुणीने वाशी खाडीच्या पुलावरून उडी मारली. मात्र स्थानिक मच्छिमारांच्या सतर्कतेमुळे तिचे प्राण वाचले.
नातं तुटलं आणि तरुणीचा जीवघेणा निर्णय
या तरुणीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. या वादानंतर त्या तरुणाने तिचा मोबाईल नंबर ब्लॉक केला होता. अनेकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करूनही त्याच्याशी बोलणे होत नसल्याने तरुणी खूप निराश झाली होती.
advertisement
याच नैराश्यातून तिने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. ती वाशी खाडीच्या पुलावर आली आणि अचानक खाडीत उडी मारली. त्या वेळी जवळच मासेमारी करत असलेल्या काही स्थानिक मच्छिमारांच्या ही बाब लक्षात आली.
रुग्णालयात उपचार सुरू
मच्छिमारांनी तात्काळ आपली बोट त्या दिशेने नेली. पाण्यात बुडत असलेल्या तरुणीला त्यांनी बाहेर काढले. त्यानंतर तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
advertisement
दरम्यान घटनेची माहिती मिळताच वाशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे. तरुणी शुद्धीवर आल्यानंतर तिचा जबाब नोंदवला जाणार आहे. तसेच प्रियकराने नंबर ब्लॉक करण्यामागील कारणांचा शोधही पोलिस घेत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 10, 2026 12:45 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Navi Mumbai News : बॉयफ्रेंडने नातं तोडलं अन् तरुणीचा टोकाचा निर्णय; धावत्या लोकलमधून खाडीत मारली उडी









